बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चाहत्यांमध्ये आजही तो बादशहा आहे. आता तर शाहरूखचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी नको इतके आतूर झाले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित ‘झिरो’ या सिनेमानंतर शाहरूखने कुठल्याही नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. साहजिकच शाहरूखला पडद्यावर पाहण्यासाठी आतूर झालेल्या चाहत्यांचा संयम आताश: सुटू पाहतोय. होय, एका अशाच चाहत्याने चक्क आत्महत्येची धमकी दिली आहे. येत्या 1 जानेवारीला तू चित्रपटाची घोषणा केली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी थेट धमकी या चाहत्याने शाहरूखला दिली आहे.
गेल्या वर्षभरात त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. शिवाय त्याने एकाही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणा-या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला आवाहन केले आहे. अशात या चाहत्यांना शाहरूख काय उत्तर देतो, कसे शांत करतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.