Join us  

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 7:00 PM

करिना आणि शाहिद यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्यांचे ब्रेकअप का झाले होते याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या.

ठळक मुद्देकरिश्मा आणि बबिता यांना शाहिद तितकासा आवडत नव्हता. तसेच त्याचे कुटुंब फिल्मी जगताशी संबंधित असले तरी ते कपूर कुटुंबाच्या तोडीचे नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांची प्रेमकथा काही वर्षांपूर्वी मीडियात चांगलीच गाजली होती. त्यांनी देखील त्यांचे प्रेमप्रकरण कधी लपवून ठेवले नाही. मीडियातील मुलाखतींमध्ये ते एकमेकांविषयी भरभरून बोलायचे. एवढेच नव्हे तर कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे ते आता लवकरच लग्न करणार असे सगळ्यांना वाटत होते. पण जब वी मेट हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली. सुरुवातीला तर हा एखादा पब्लिसिटी स्टंट असल्याचे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण काहीच काळात त्यांच्यात खरेच ब्रेकअप झाले असल्याचे सगळ्यांना कळले.

करिना आणि शाहिद यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्यांचे ब्रेकअप का झाले होते याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण त्या दोघांनी त्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले होते. मिस मालिनीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका बातमीनुसार करिना आणि शाहिदच्या ब्रेकअपला करिनाची आई बबिता आणि बहीण करिश्मा कारणीभूत होत्या. 

त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, करिश्मा आणि बबिता यांना शाहिद तितकासा आवडत नव्हता. तसेच त्याचे कुटुंब फिल्मी जगताशी संबंधित असले तरी ते कपूर कुटुंबाच्या तोडीचे नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, करिना शाहिदच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती दिग्दर्शकांना तिच्यासोबत शाहिदलाच घेण्याविषयी सांगत असे. याचा तिच्या करियरवर परिणाम होत होता. त्यामुळे त्यांनी करिनाला करियरमध्ये लक्ष केंद्रित करायला सांगितले होते.

शाहिद आणि करिना यांच्या ब्रेकअपला आता अनेक वर्षं झाले असून ते आपआपल्या संसारात खूश आहेत. करिनाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसोबत झाले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे

तर शाहिदचे लग्न मीरा राजपूत सोबत झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून शाहिदची पत्नी बॉलिवूडशी संबंधित नसली तरी ती अनेक पुरस्कार सोहळ्यांना, कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावते. 

 

टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूरसैफ अली खान करिश्मा कपूरमीरा राजपूतबबिता