Join us

चक्क! ३ दिवस पाण्यात शूटिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:13 IST

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदा 'बागी' चित्रपटात सोबत काम करत आहे. दोघांनी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. ते ...

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदा 'बागी' चित्रपटात सोबत काम करत आहे. दोघांनी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. ते दोघे एवढे शूटिंगमध्ये व्यस्त आहेत की, त्यांना त्यांच्या तब्येतीचीही काळजी नाहीये. खरंतर त्यांना पाण्यात एक मोठा सिक्वेन्स शूट करायचा होता. शूटिंगदरम्यान दोघेही जास्त वेळ पाण्याने भिजलेले होते कारण त्यांना पाण्यातच शूटिंग करायची होती. असे जवळपास २-३ दिवस सुरू होते. ते पाणी सुकण्याची काही काळजी नव्हती कारण, त्यांना शूटिंगसाठी भिजलेले राहायचे होते. सर्वांना त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी होती, तर दुसरीकडे श्रद्धा आणि टायगर १0-१२ तास भिजूनही कोणतीही तक्रार केली नाही.