Join us

‘हम हैं राही प्यार के’ चा जुहीने केला फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 21:50 IST

 या चित्रपटाला  २३ जुलैला २३ वर्ष पूर्ण  होत आहेत. त्यानिमित्ताने जुही चावला हिने या चित्रपटातील  आपल्या आठवतीणतील एक सुंदर ...

 या चित्रपटाला  २३ जुलैला २३ वर्ष पूर्ण  होत आहेत. त्यानिमित्ताने जुही चावला हिने या चित्रपटातील  आपल्या आठवतीणतील एक सुंदर  फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहिल्याने कुणीही आपल्या लहानपणींच्या आठवणीमध्ये रमल्याशिवाय राहणार नाही. परंतु, त्याअगोदर आपल्यालासाठी एक प्रश्न आहे. त्या फोटोमध्ये लाल टी शर्ट परिधान केलेल्या लहान मुलाला आपण ओळखले का?  हा प्रश्न आम्ही नाही तर जुही चावला हीने विचारला आहे. तसेच तिने हा मुलगा एक अभिनेता असल्याचेही सांगितले आहे. ट्टिवर जुही हिच्या चाहत्यांनी या  प्रश्नाचे उत्तर तिला तात्काळ दिले आहे. हा लाल टी शर्ट परिधान केलेला मुलगा हा दुसरा तिसरा कुणी नसून, कुणला खेमू असून, तो सोहा अली खानचा पती बनलेला आहे. या चित्रपटात आमिर व जुही बरोबरच दिसणाºया सर्व मुलांनी प्रेक्षकांचे ह्दय जिंक ले होते. ‘हम हैं राही प्यार’ हे या चित्रपटाचे शीर्षक गीत हे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी आहे.