Join us

Watch Video : न्यूज अ‍ॅँकर बनलेल्या वीणा मलिकचा भारत-इस्त्राइल मैत्रीमुळे होतोय जळफळाट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 20:32 IST

​पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौºयावर असून, त्यांच्या दौºयाला मिळत असलेल्या अभूतपूर्व यशामुळे चीन आणि पाकचा संताप अनावर होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौºयावर असून, त्यांच्या दौºयाला मिळत असलेल्या अभूतपूर्व यशामुळे चीन आणि पाकचा संताप अनावर होताना दिसत आहे. सुरुवातीला अमेरिका दौºयामुळे चीनचे जळफळाट झाला असून, आता इस्त्राइल दौºयामुळे पाकिस्तानची काहीशी अशीच गत झाल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा पाक अभिनेत्री वीणा मलिक पाकिस्तानमध्ये बसून, भारताविरुद्ध बरळताना दिसली. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली वीणा मलिक सध्या पाकिस्तानात बसून, भारताविरोधात उलट-सुलट वक्तव्य करताना बघावयास मिळत आहे. होय, पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर वीणा मलिक सध्या एका पाक न्यूज चॅनेलमध्ये अ‍ॅँकर म्हणून काम करीत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून वीणा भारताविरोधात वायफळ बडबड करीत आहे. त्यातच इस्त्राइलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे झालेले जंगी स्वागत तिला चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिने पंतप्रधान मोदी आणि इस्त्राइली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर वायफळ हल्ले करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा चॅनेलने वीणाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. ‘ब्रेकिंग न्यूज विद वीणा मलिक’ या शोच्या माध्यमातून वीणा दोन्ही देशांच्या पंतप्रधानांविरोधात अपशब्दांचा वापर करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वीणा असे म्हणताना दिसत आहे की, भारत आणि इस्त्राइल हे दोन्ही देश मुस्लीम समुदायाचे शत्रू झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये वाढत्या मैत्रिपूर्ण संबंधांवर वीणाने म्हटले की, सध्या हे दोन्ही देश मानवतावादाचे शत्रू बनताना दिसत आहेत. पुढे बोलताना तिने दोन्ही देशांना ‘राक्षशी प्रवृत्ती’ असे संबोधले आहे. गेल्या मंगळवारी मोदी इस्त्राइल दौºयावर पोहोचले होते. याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये बरेचसे महत्त्वपूर्ण करारही करण्यात आले. मात्र ही बाब पाक आणि चीनच्या फारशी पचनी पडली नसावी असेच काहीसे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. दरम्यान, पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर वीणा पाकमधील एक न्यूज चॅनेलमध्ये अ‍ॅँकर म्हणून काम करीत आहे. ती २०१० मध्ये बिग बॉसच्या सीझन ४ मध्ये सहभागी झाली होती. त्याव्यतिरिक्त २०१२ मध्ये आलेल्या ‘दाल में कुछ काला है’ या चित्रपटात ती बघावयास मिळाली होती. पाक कलाकारांना भारतात प्रवेश बंदी केल्याने वीणा मलिकसारख्या कलाकारांवर न्यूज अ‍ॅँकर म्हणून काम करण्याची वेळ उद्भवली असल्यानेच, तिचा जळफळाट होत असावा अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे.