Join us

Watch Video! -अन् सनी लिओनीने फाडला स्वत:चा CV!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 08:56 IST

सनी लिओनी तिचे बायोपिक ‘करणजीत- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’मुळे सध्या चर्चेत आहे. या बायोपिकचे सनीने सध्या जोरदार प्रमोशन चालवले आहे.

सनी लिओनी तिचे बायोपिक ‘करणजीत- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’मुळे सध्या चर्चेत आहे. या बायोपिकचे सनीने सध्या जोरदार प्रमोशन चालवले आहे. हे बायोपिक मुळात एक वेबसीरिज आहे आणि सनी लिओनीने स्वत: त्यात स्वत:ची भूमिका साकारली आहे.

हे बायोपिक प्रमोट करताना सनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सनीच्या हातात तिचा CV आहे.  प्रत्येकालाच CVची गरज आहे. पण माझी कहाणी वेगळी आहे, असे म्हणत सनी हातातील CV फाडून टाकते, असे या व्हिडिओत दिसतेय. ‘माझी कहाणी CVमध्ये येऊ शकत नाही़ ती पाहावी आणि अनुभवावी लागेल,’असे तिने लिहिले आहे. सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी एक अ‍ॅडल्ट स्टार होती़ तिचे नाव करणजीत कौर होते.आदित्य दत्त दिग्दर्शित करत असलेल्या या बायोपिकमध्ये १४ वर्षीय रसा सौजनी सनीच्या बालपणीची भूमिका वठवणार आहे.

सनी रिऑलिटी शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाली होती. याशोनंतर तिच्या बॉलिवूड प्रवासाची दारं उघडी झाली. याच घरात महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म2’ची आॅफर दिली होती. पुढे तिला एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस2’ही मिळाला. यानंतर शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून अनेक बिग बॅनरच्या चित्रपटात आयटम साँग करताना ती दिसली.   सनी लिओनी भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे. सनी वीरमादेवी या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात ती वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वीरमादेवी एक यौद्धा राजकुमारी असणार आहे. 

टॅग्स :सनी लिओनी