Join us

Watch Video : रजनीकांतच्या विदेशातील सेल्फी व्हिडीओची देशात धूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 19:23 IST

​सुपरस्टार रजनीकांत सध्या रुटीन मेडिकल चेकअपकरिता यूएसला गेले आहेत. मात्र अशातही ते त्यांच्या फॅन्सला कनेक्ट राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत.

सुपरस्टार रजनीकांत सध्या रुटीन मेडिकल चेकअपकरिता यूएसला गेले आहेत. मात्र अशातही ते त्यांच्या फॅन्सला कनेक्ट राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला असून, ते विदेशात असतानाही चाहत्यांसाठी फोटोज् किंवा व्हिडीओ शेअर करीत आहेत. रजनीकांत यांनी नुकताच असा एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फरारी एन्जॉय करतानाचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. या सेल्फी व्हिडीओमध्ये रजनीकांत बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये केवळ रजनीकांतच नव्हे तर त्यांचा ड्रायव्हरही बघावयास मिळत आहे. विदेशात शूट केलेला हा व्हिडीओ देशात खूपच हिट होत आहे. यूएसला जाण्याअगोदर रजनीकांत जीएसटीला विरोध करताना बघावयास मिळाले होते. चित्रपटगृह मालकांचे समर्थन करताना त्यांनी त्यांच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवरून याविषयी ट्विटही केले होते. त्यांनी त्यांचे म्हणणे मांडताना म्हटले होते की, ‘सरकारला लोकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पाऊले उचलायला हवीत. कारण हा लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न असतो. रजनीकांत यांच्या विरोधाला अनेकांनी समर्थन दिले होते. तसेच त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही केले गेले. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/LittleOwlStudios/videos/1566836193367848/">असो ‘कबाली’च्या यशानंतर रजनीकांत लवकरच ‘काला करिकलन’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट गॅँगस्टार ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती धनुष करीत आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त हुमा कुरेशी, नाना पाटेकर, ईश्वरी राव, अंजली पाटील आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच रजनीकांतसोबतचा नाना पाटेकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो चित्रपटाच्या सेटवरीलच असल्याचे पुढे स्पष्ट झाले होते. रजनीकांत यांचा हा ‘काला करिकलन’ चित्रपट २०१८ मध्ये चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त रजनीकांत यांचा ‘२.०’ हा चित्रपटदेखील रिलीजच्या मार्गावर आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्लॅन केला जात असून, याकरिता विदेशी टूरचे आयोजन केले जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते. सुरुवातीला हा चित्रपट याच वर्षाच्या अखेरीस रिलीज केला जाणार होता. परंतु आता त्याच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.