Join us

Watch Video : साबणाची अ‍ॅड करून मॅचोमॅन विनोद खन्नांनी अ‍ॅड इंडस्ट्रीचा बदलला चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 20:37 IST

​ज्या काळात ब्यूटी प्रॉडक्टच्या अ‍ॅडमध्ये फक्त महिला कलाकारांचाच दबदबा होता, त्याकाळात मॅचोमॅन विनोद खन्ना यांनी एका साबणाची अ‍ॅड करून जाहिरात क्षेत्रातदेखील स्वत:चे वलय निर्माण केले होते.

ज्या काळात ब्यूटी प्रॉडक्टच्या अ‍ॅडमध्ये फक्त महिला कलाकारांचाच दबदबा होता, त्याकाळात मॅचोमॅन विनोद खन्ना यांनी एका साबणाची अ‍ॅड करून जाहिरात क्षेत्रातदेखील स्वत:चे वलय निर्माण केले होते. अ‍ॅडगुरू दिलीप चेरियन यांच्यानुसार इंडियन अ‍ॅड इंडस्ट्रीला बदलण्यात विनोद खन्ना यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्याचे झाले असे की, १९५२ मध्ये गोदरेजने सिन्थॉल नावाचे साबण लॉन्च केले होते. फ्रेशनेससह क्लीननेस असा या साबणाचा कॉन्सेप्ट होता. सुरुवातीच्या काळात या साबणाच्या अ‍ॅडसाठी प्रसिद्ध अभिनेत्री मूनमून सेन हिच्याशी करार करण्यात आला होता. काही काळानंतर कंपनीला याची जाणीव झाली की, या अ‍ॅडसाठी महिला कलाकार पूर्णत: फिट बसत नाही. कारण फ्रेशनेस आणि क्लीननेस ही कन्सेप्ट पुरुषांनादेखील लागू होते. जेव्हा त्यांनी या अ‍ॅडसाठी चेहरा शोधण्याचे काम सुरू केले, तेव्हा त्यांनी मॅचोमॅन विनोद खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. विनोद यांनी १९८०च्या काळात सिन्थॉलची अ‍ॅड करून आपला जलवा दाखविला होता. शिवाय ज्या काळात ब्यूटी प्रॉडक्टमध्ये महिला कलाकारांचा दबदबा होता, त्याकाळात त्यांनी केलेला हा कारनामा खरोखरच कौतुकास्पद असा होता. घोड्यावर स्वार होऊन अन् नंतर आलिशान कारमध्ये फेरफटका मारणाºया विनोद खन्ना यांचा अ‍ॅडमधील रुबाब बघण्यासारखा आहे. त्यानंतर मात्र ब्यूटी अ‍ॅडमध्ये पुरुष कलाकार असा जणू काही ट्रेण्डच निर्माण झाला होता. कारण त्यानंतर हार्ड, स्ट्रॉन्ग, टफ क्लीन यांसारख्या प्रॉडक्टसाठी हमखासपणे पुरुष कलाकारांना विचारणा होऊ लागली. विनोद खन्ना यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम असून, बºयाचशा ब्यूटी प्रॉडक्टमध्ये पुरुष कलाकार काम करताना बघावयास मिळतात.