Watch Video : ईशा गुप्ताच्या हॉट व्हिडीओने लावली आग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 17:04 IST
बॉलिवूडची अॅँजेलिना जोली अर्थात अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या एका हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हा व्हिडीओ तिच्या एका फोटोशूटमधील असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
Watch Video : ईशा गुप्ताच्या हॉट व्हिडीओने लावली आग!
बॉलिवूडची अॅँजेलिना जोली अर्थात अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या एका हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हा व्हिडीओ तिच्या एका फोटोशूटमधील असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वत्र आग लावली असून, चाहत्यांकडून हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल केला जात आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला काही वेळातच हजारो युजर्सनी बघितले आहे. ‘जन्नत-२’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया ईशाने स्वत:च हा फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये... असेही लिहिले आहे. ईशाच्या या कॅप्शनमुळे आता चाहत्यांना त्याच्या या हॉट अॅण्ड सेक्सी फोटोंची आतुरता लागली आहे. त्यामुळे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये युजर्स तिला या फोटोशूटविषयी प्रश्न विचारत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘कमांडो-२’मध्ये ईशा झळकली होती. मात्र या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता. दरम्यान, सध्या ईशा तिच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. चित्रपटात ईशासह अजय देवगण, इमरान हाशमी, सलियाना डिक्रूज आणि विद्युत जामवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आहे. वास्तविक ईशा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर शेअर करीत असलेल्या हॉट फोटोंमुळे अधिक चर्चेत असते. सध्या ईशा पोल डान्स शिकत असून, त्याचे काही फोटोज् आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. यामध्येही तिचा सेक्सी अंदाज बघावयास मिळाला होता. सध्या ईशा तिच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याबाबतचेही फोटोज ती शेअर करीत आहे.