Watch Trailer : ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या ट्रेलरमधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 19:43 IST
बहुप्रतिक्षित अक्षयकुमार याच्या आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून, ट्रेलरमधील अक्षयचा धमाकेदार अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे.
Watch Trailer : ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या ट्रेलरमधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश!
बहुप्रतिक्षित अक्षयकुमार याच्या आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून, ट्रेलरमधील अक्षयचा धमाकेदार अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर कसा असेल याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच निर्माते एका पाठोपाठ एक चित्रपटाचे पोस्टर रिलीज करीत असल्याने ट्रेलरविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांना ट्रेलर नक्कीच भावेल असेच काहीसे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयकुमारने ट्रेलर रविवारी रिलीज केला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, चित्रपटाची कथा कशी असेल हे यातून स्पष्ट होते. अक्षयने त्याच्या सोशल अकाउंटवरून ट्रेलर पोस्ट केला आहे. तसेच ‘एक प्रेम कथा जिचे क्रांतीमध्ये रूपांतर झाले, सादर करीत आहोत टॉयलेट एक प्रेम कथाचा ट्रेलर,’ अशा ओळीही लिहिल्या. ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास, घरोघरी शौचालय असावे हाच संदेश यातून देण्यात आला आहे. अक्षयकुमार आणि भूमी पेडनेकर यांची जोडी कमालीची दिसत असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असेच काहीसे चित्र दिसत आहे. अक्षयचा हा चित्रपट स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनारायण सिंग यांनी केले आहे. चित्रपटात भूमी अक्षयची पत्नी दाखविण्यात आली असून, घरात शौचालय नसल्याने अक्षय आणि तिच्यात वाद होतो. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील धार्मिक वारसा डावलून तो शौचालय बनविण्यासाठी संघर्ष करतो. हीच कथा चित्रपटाचा मुख्य बिंदू आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने प्रमोशनदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याविषयीची चर्चा केली होती. शिवाय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनाही चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून, हा चित्रपट टॅक्स फ्री दाखविला जावा, अशी मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. ११ आॅगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.