WATCH : ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’चे ‘हस मत पगली’ गाणे आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 11:12 IST
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’चा ट्रेलर अलीकडेच आला. या ट्रेलरला लोकांची चांगलीच दाद मिळाली. ट्रेलरनंतर या चित्रपटाचे पहिले गाणे ‘हस मत पगली’ आऊट झाले आहे. अक्षय कुमार व भूमी पेडणेकर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.
WATCH : ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’चे ‘हस मत पगली’ गाणे आऊट!
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’चा ट्रेलर अलीकडेच आला. या ट्रेलरला लोकांची चांगलीच दाद मिळाली. ट्रेलरनंतर या चित्रपटाचे पहिले गाणे ‘हस मत पगली’ आऊट झाले आहे. अक्षय कुमार व भूमी पेडणेकर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.या चित्रपटात अक्षयने केशव नामक पात्र साकारले आहे. याऊलट भूमीने जया नामक व्यक्तिरेखा रंगवली आहे. चित्रपटात केशव व जयाची प्रेमकथा दिसणार आहे. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नाही, या कारणावरून दोघांचेही लग्न तुटण्यापर्यंत येते.गाण्याबद्दल बोलायचे झाल्यास यात केशवचे जयाबद्दलचे प्रेम दिसतेय. केशव जयाच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की, तिची एक झलक पाहण्यासाठी तासन तास ताटकळत बसतो. दिवसरात्र तिचा पिच्छा पुरवतो. शिवाय तिच्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण स्वत:च्या मोबाईलमध्ये टिपत सुटतो. या गाण्यातील दोन सीन्स तुम्हाला प्रचंड आवडतील. ते म्हणजे, केशव स्वत:चा चेहरा लपवत जया व तिच्या मैत्रिणींना चहा देतो. दुसरा सीन म्हणजे, स्वत:च्या हाताला फोन बनवत, जयाच्या एका मैत्रिणीला वेळ विचारत निघून जातो. गाण्याचे बोल आणि संगीत कुणालाही आवडेल, असेच आहेत. सोनू निगमच्या आवाजाने गाण्यात आणखी जीव ओतला आहे. सिद्धार्थ आणि गरिमाचे बोल असलेले हे गाणे तुम्ही पाहायलाच हवे. ALSO READ : अक्षय कुमारची विनंती; ‘लौटा दो लोटा पार्टी को’!!‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला समर्थन करणार आहे. या चित्रपटातून स्वच्छता न राखणा-यांवर विनोदाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. केशव हा पे अॅण्ड युज टॉयलेट चालवत असतो. यादरम्यान जया नामक मुलीच्या केशव प्रेमात पडतो आणि पुढे दोघांचे लग्न होते. या चित्रपटाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे.