Join us  

हृतिक रोशनने केला लगावे लू लिपस्टिक या भोजपुरी गाण्यावर डान्स, पाहा हा धमाल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:19 PM

सुपर 30 या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात हृतिक आपल्याला लगावे लू लिपस्टिक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

ठळक मुद्देलगावे लू लिपस्टिक हे भोजपुरी गाणे अतिशय प्रसिद्ध असून आजवर अनेकांनी या गाण्यावर ताल धरला आहे आणि आता हृतिकने या गाण्यावर ताल धरला असून त्याचा हा अंदाज त्याच्या फॅन्सना चांगलाच भावत आहे.

हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. पण त्याचसोबत या चित्रपटातील हृतिकचा डान्स देखील प्रेक्षकांना भावला होता. त्याच्या डान्सिंग स्टाईलची पहिल्या चित्रपटापासूनच चर्चा रंगली आहे. हृतिकने आजवर कभी खुशी कभी गम, जोधा अकबर, क्रिश, कोई मिल गया यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या सगळ्याच चित्रपटात आपल्याला त्याचा डान्सचा जलवा पाहायला मिळाला आहे.

हृतिक रोशनचासुपर 30 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हृतिक सध्या करत आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हृतिकच्या फॅन्सना तर प्रचंड आवडत आहे. कारण यात चक्क हृतिक आपल्याला डान्स करताना दिसत आहे. लगावे लू लिपस्टिक हे भोजपुरी गाणे अतिशय प्रसिद्ध असून आजवर अनेकांनी या गाण्यावर ताल धरला आहे आणि आता हृतिकने या गाण्यावर ताल धरला असून त्याचा हा अंदाज त्याच्या फॅन्सना चांगलाच भावत आहे.

सुपर 30’ हा चित्रपट नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलचे नाव मीटू मोहिमेत आले. त्यामुळे त्याला या चित्रपटातून हटवण्यात आले. साहजिकच ‘सुपर 30’लांबला. पुढे या चित्रपटासाठी 26 जानेवारी 2019 चा मुहूर्त ठरला. पण यावेळी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ आडवा आला. त्यामुळे हृतिकने ‘सुपर 30’ची रिलीज डेट पुढे ढकलली होती. 

‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपला पूर्ण वेळ ते विद्यार्थ्यांसोबत असायचे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार मदत करतात. 

टॅग्स :हृतिक रोशनसुपर 30