Join us  

​बरसात नव्हे तर हा होता बॉबी देओलचा पहिला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 5:35 AM

बॉबी देओल हा धर्मेंद्र यांचा लहान मुलगा. त्याचा जन्म २७ जानेवारीला मुंबईत झाला. वडील हे प्रसिद्ध अभिनेते असल्याने बॉबीला ...

बॉबी देओल हा धर्मेंद्र यांचा लहान मुलगा. त्याचा जन्म २७ जानेवारीला मुंबईत झाला. वडील हे प्रसिद्ध अभिनेते असल्याने बॉबीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड होती. बॉबी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याचा मोठा भाऊ सनी देओलने या क्षेत्रात त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले होते. सनीनंतर आता बॉबी देखील चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार हे लोकांना कळल्यानंतर धर्मेंद्र यांच्या या लहान मुलाविषयी लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. बरसात या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या या चित्रपटात ट्विंकल खन्ना त्याची नायिका होती. या चित्रपटातील बॉबीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम नवोदित अभिनेता या फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. पण तुम्हाला माहीत आहे का बरसात हा बॉबी देओलचा पहिला चित्रपट नव्हता. या चित्रपटाच्या आधी त्याने एका चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. बॉबीने धर्मवीर या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर तो अभिनयक्षेत्राकडे वळला नाही. त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतरच त्याने या क्षेत्रात येण्याचा विचार केला. बॉबीने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले. गुप्त, सोल्जर, हमराज यांसारखे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.तुम्हाला माहीत आहे का, बॉबी आणि अभिनेत्री निलमचे सिरियस अफेअर होते आणि ते दोघे जवळजवळ पाच वर्षं नात्यात होते. बॉबीला निलमसोबत लग्नदेखील करायचे होते आणि त्याबाबत त्याने त्याचे वडील धर्मेंद्र यांनादेखील सांगितले असल्याचे म्हटले जाते. पण निलम ही त्याकाळात चित्रपटांमध्ये काम करत होती. धर्मेंद्रला अभिनेत्री सून म्हणून मान्य नव्हती आणि त्याचमुळे त्याने या दोघांच्या लग्नाला विरोध केला. धर्मेंद्र लग्नाला तयारच नसल्याने ब्रेकअप करण्याशिवाय बॉबीकडे कोणताच पर्याय नव्हता. याच कारणामुळे निलम आणि बॉबी यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर काही वर्षांनी बॉबीने तान्यासोबत लग्न केले. तान्या ही एका प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगी असून त्यांच्या संसाराला अनेक वर्षं झाली आहेत. तान्या आणि बॉबी यांना आता दोन मुले देखील आहेत. Also Read : धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीसोबत साजरे केले न्यू इअर; बऱ्याच वर्षांनंतर पहिल्या पत्नीचा फोटो आला समोर!