Join us  

​राज कूपर लोकांशी भांडायला निघाले म्हणून वहिदा रहमान यांनी केले असे काही.... वाचून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 10:05 AM

राज कपूर आणि वहिदा रहमान यांनी तिसरी कसम या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच ...

राज कपूर आणि वहिदा रहमान यांनी तिसरी कसम या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटातील राज आणि वहिदा यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेचा एक किस्सा वहिदा रहमान यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिला आहे. राज आणि वहिदा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मध्यप्रदेश मधील बीना येथे गेले होते. बीना येथे जाण्यासाठी आणि येण्यासाठी विमान प्रवास उपलब्ध नसल्याने त्यांनी ट्रेनने प्रवास केला होता. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर मुंबईला येण्यासाठी वहिदा रहमान आणि राज कपूर निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत राज यांचे काही मित्र, वहिदा यांची बहीण आणि हेअर ड्रेसर देखील होती. ते सगळेच ट्रेनमधील एसी कोचने प्रवास करत होते. प्रत्येकासाठी वेगवेगळी एसी रूम होती. ट्रेन सुरू होताच एकाच मिनिटांत पुन्हा ट्रेन थांबली. त्यामुळे काय होत आहे हे राज कपूर, वहिदा रहमान यांना काहीच कळत नव्हते. थोड्याच वेळात काही लोकांनी सांगितले, की ही ट्रेन कॉलेजच्या मुलांनी अडवली आहे. ट्रेनच्या समोर शेकडोने मुले असून त्यांना राज आणि वहिदा रहमान यांना भेटायची इच्छा आहे. त्यांना भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही असे त्यांनी सांगितले आहे. हे ऐकून राज कपूर बाहेर आले ते सगळ्या विद्यार्थ्यांना भेटले. राज यांना भेटून विद्यार्थ्यांना प्रचंड आनंद झाला होता. पण तरीही ते वहिदा यांना भेटण्याचा हट्ट करत होते. पण तिथल्या गर्दीचा विचार करता वहिदा यांनी ट्रेनमधून बाहेर येऊ नये असे राज यांना वाटत होते. वहिदा बाहेर येणार नाही असे सांगत राज आतमध्ये निघून गेले. त्यावर मुलांनी गाडीवर दगडफेक करायला सुरुवात केली. यामुळे गाडीच्या काचादेखील फुटल्या. या सगळ्या प्रकरणामुळे राज प्रचंड चिडले ते त्या मुलांसोबत भांडायला ट्रेनच्या बाहेर जात होते. त्यावर त्यांच्या मित्रांनी त्यांना थांबवले आणि थेट वहिदा रहमान यांच्याकडे त्यांना घेऊन गेले. राज कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे मित्र पोलिसांची मदत घ्यायला गेले. ते निघून गेल्यावर राज बाहेर निघू नयेत यासाठी चक्क वहिदा रहमान या राज यांच्या अंगावर बसून होत्या. काहीच वेळात पोलिस आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि राज, वहिदा यांची ट्रेन रवाना झाली. Also Read : राजेश खन्ना नव्हे तर हा अभिनेता होता आनंद या चित्रपटासाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली चॉईस