Join us  

Vikram Vedha: सैफ अली खानने विक्रम वेधातील अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी घेतली अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 6:27 PM

. ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात सैफ अली खानने विक्रम या एका कठोर, कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे तर हृतिक रोशनने वेधाची भूमिका साकारली आहे.

सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधाचा उत्कृष्ट ट्रेलर रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात सैफ अली खानने विक्रम या एका कठोर, कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे तर हृतिक रोशनने वेधाची भूमिका साकारली आहे

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, सैफ त्याच्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये एका पोलिसाच्या अवतारात पडद्यावर येतो. सैफला अशी भूमिका साकारताना पाहणे हे प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज असले तरी, या व्यक्तिरेखेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. सैफ अली खानने या चित्रपटासाठी खऱ्या शस्त्रास्त्रांसह सराव केला होता. सैफ अली खानने या चित्रपटासाठी खऱ्या बंदुकींचा सराव करण्यापासून ते खऱ्या बंदुकीचा आवाज आणि चित्रीकरणाची यंत्रणा समजून घेण्यापर्यंत सर्व काही केले. सैफने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रत्येक लहान गोष्टीवर काम केलं.

तामिळ ‘विक्रम वेधा’ चित्रपट 21 जुलै 2017 रोजी केवळ तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. केवळ 11 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 70 कोटी रुपयांचा गल्ला केला होता. आता याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पुष्कर-गायत्री हेच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

टॅग्स :सैफ अली खान हृतिक रोशन