Join us  

भाजपा आमदाराचा विराट कोहलीला अजब सल्ला! ‘पाताल लोक’मुळे विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 4:20 PM

म्हणे, तो देशभक्त आहे. पण अनुष्काने देशद्रोही काम केले आहे...

ठळक मुद्देअनुष्का शर्माच्या ‘पाताललोक’  या वेबसीरिजने अनेक वाढ ओढवून घेतले आहेत. 

पाताल लोक’ या वेबसीरिजवरून इतका वाद होईल आणि हा वाद आपल्या घरापर्यंत येईल, याची कल्पनाही अनुष्का शर्माने ही वेबसीरिज प्रोड्यूस करताना केली नसावी. गेल्या काही दिवसांपासून ‘पाताल लोक’ प्रचंड वादात आहे. यानिमित्ताने अनुष्काला कायदेशीर नोटीसही बजावली गेलीय. तिच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आता तर हा वाद तिच्या संसारावर उठू पाहतोय. होय, विराट कोहलीनेअनुष्का शर्माला घटस्फोट द्यावा, असा अजब सल्ला या वादाच्या पार्श्वभूमीवर एका भाजपा आमदाराने दिला आहे. गाझियाबादेतील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ‘पाताल लोक’ प्रकरणी अनुष्काविरोधात तक्रार दाखल आहे.  या वेबसीरिजध्ये आपल्या परवानीशिवाय आपला फोटो वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  आता याच नंदकिशोर गुर्जर यांनी या वादावरुन  विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी  मागणी केली आहे.‘न्यूजरुम पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली, ‘देशापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्याने देशाचे नाव मोठे केले, तो देशभक्त आहे. पण अनुष्काने देशद्रोही काम केले आहे, त्यामुळे विराटने अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यायला हवा, असे नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटले आहे.

काय आहे वादअलीकडे भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ‘पाताललोक’ प्रकरणी अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली होते. गुर्जर यांनी अनुष्कावर अनेक गंभीर आरोप करत याप्रकरणी अनुष्काविरोधात रासुकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी  केली होती. अनुष्काने माझा फोटो एका गुन्हेगारासोबत दाखवला. तसेच वेबसीरिजमध्ये गुर्जर समुदायाबद्दलही चुकीचे चित्रण केले, असे त्यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

वेबसीरिज एक, वाद अनेक

अनुष्का शर्माच्या ‘पाताललोक’  या वेबसीरिजने अनेक वाढ ओढवून घेतले आहेत. सर्वप्रथम गोरखा समुदायाने या वेबसीरिजविरोधात तक्रार केली. यानंतर नंदकिशोर यांनी ‘पाताललोक’विरोधात तक्रार दाखल केली होती. आज सिक्कीमचे खासदार इंद्र हंग सुब्बा यांनीही अनुष्काच्या या वेबसीरिजवर आक्षेप नोंदवत याप्रकरणी थेट माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. ‘पाताललोक’विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

टॅग्स :पाताल लोकअनुष्का शर्माविराट कोहली