विराटच्या पराभवाला अनुष्का का जबाबदार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:33 IST
गे ल्या वर्षभरापासून विराट कोहली -अनुष्का शर्मा हे कपल बॉलीवूडमध्ये आणि क्रीडाजगतात फारच फेमस झाले आहे. अनुष्का नेहमी ...
विराटच्या पराभवाला अनुष्का का जबाबदार ?
गे ल्या वर्षभरापासून विराट कोहली -अनुष्का शर्मा हे कपल बॉलीवूडमध्ये आणि क्रीडाजगतात फारच फेमस झाले आहे. अनुष्का नेहमी विराटच्या क्रिकेटमॅचवेळी स्टेडियममध्ये उपस्थित असते. यावर्षीच्या सुरूवातीला जेव्हा वर्ल्ड कप साठीच्या मॅचेस सुरू होत्या. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सेमीफायनल मध्ये भारताच्या पराभवाला चाहते अनुष्काला जबाबदार धरू लागले. त्यानंतर सोशल मीडियानेही हा मुद्दा उचलून धरला. त्याने जर चांगला स्कोअर केला नाही तर सर्वजण अनुष्काला जबाबदार मानतात. पण ती स्वत:ला जबाबदार मानते का ? ही महत्त्वाची बाब आहे. उलट तिला वाटते की, 'तिने काही चुकीचे तर नाही ना केले स्टेडियममध्ये येऊन. '