Join us

विराट-अनुष्काची क्युट वामिका झाली दोन वर्षांची, अभिनेत्री शेअर केला Unseen Photo; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:21 IST

अनुष्का शर्माने वामिकाच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अनुष्काने वामिकाचा फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Vamika Birthday: अनुष्का शर्मा  (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli)ची क्युट वामिका(Vamika) दोन वर्षांची झाली आहे. या दोघांनी अद्याप वामिकाचा चेहरा कोणालाही दाखवलेला नाही, परंतु सतत मुलीचे फोटो पोस्ट करत आहेत. आता अनुष्का शर्माने वामिकाच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्का शर्माने अशी पोस्ट लिहिली आहे की ती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच चाहते आणि सेलिब्रिटींनी वामिकावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला.

दोन वर्षांची झाली वामिकाविराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची लाडकी वामिका आता दोन वर्षांची आहे. वामिकाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने वामिकासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का वामिकाला मिठी मारून हसताना दिसत आहे. फोटोमध्ये अनुष्काचा चेहरा किंचित दिसतो आणि वामिका पाठमोरी दिसतेय. हा फोटो कुठल्यातरी गॉर्डनमधला दिसतोय. 

विराट कोहलीने ही केली कमेंटहा सुंदर फोटो शेअर करत अनुष्का शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले- 'दोन वर्षांपूर्वी माझ्या हृदयातील प्रेमासाठीच जागा आणखी वाढली होती.' यासोबतच हार्ट आयकॉन शेअर केला आहे.अनुष्काच्या या पोस्टवर विराट कोहलीने कमेंटमध्ये 5 हार्ट आयकॉन शेअर केले आहेत. याशिवाय गौहर खानने हार्ट आयकॉन देखील शेअर केला आहे. नीती मोहनने लिहिले - 'वामिका..खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद.'

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली