Join us

विनोद खन्ना : नाशिकच्या बार्न्स स्कूलचा स्कॉलर विद्यार्थी हरपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 13:06 IST

सतीश डोंगरे९०च्या दशकात आपल्या अभिनयाने इंडस्ट्री गाजविणारे अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त पसरताच नाशिक येथील देवळाली परिसरातील ...

सतीश डोंगरे९०च्या दशकात आपल्या अभिनयाने इंडस्ट्री गाजविणारे अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त पसरताच नाशिक येथील देवळाली परिसरातील बार्न्स स्कूलमध्ये शोककळा पसरली. बार्न्स स्कूलचा स्कॉलर विद्यार्थी अशी ओळख असलेला विनोद त्याकाळी खेळातही निष्णात असल्याच्या आठवणी सांगत असताना शाळेच्या शिक्षकांचे डोळे पानावले होते. विनोद खन्ना यांच्या बॅचमधील विद्यार्थी अन् शिक्षकांचे छायाचित्रहोय, विनोद खन्ना यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये त्यांनी १९६१ साली प्रवेश घेतला होता. अतिशय स्कॉलर विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. शिवाय खेळातही त्यांचा दबदबा होता. त्यामुळेच त्यांनी शाळेच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले होते. तसेच हॉकी आणि फुटबॉल संघामध्येही त्यांनी स्थान मिळवले. विनोद खन्ना यांचे हजेरी पटावर नाव असलेले छायाचित्रअभ्यासाबरोबरच खेळात निष्णात असलेला विनोद त्यावेळी शाळेतील सगळ्याच शिक्षकांचा प्रिय विद्यार्थी होता. विनोद खन्ना यांनाही त्यांच्या शाळेप्रती प्रचंड आदर होता. त्यामुळेच त्यांनी २००९ मध्ये आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या करताना शिक्षकांशी हितगुज साधले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला होता. आपल्या शाळेच्या आवारात फेरफटका मारताना विनोद खन्नागुरुवारी सकाळी जेव्हा विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा शाळेतील शिक्षक तथा कर्मचाºयांमध्ये शोककळा पसरली. यावेळी शिक्षकांनी २००९ च्या स्नेहसंमेलनातील विनोद खन्ना यांचे काही छायाचित्र बोर्डावर लावून आठवणींना उजाळा दिला. बार्न्स स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विनोद खन्ना शोकसभेचे आयोजनबार्न्स स्कूलमध्ये शालेय व जुन्या अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभिनेता विनोद खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी (दि.२८) सकाळी शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बार्न्स स्कूलच्या वतीने देण्यात आली आहे.