Join us

'सूर्यवंशी' आणि 'सिम्बा'चा खलनायक रिअल लाइफमध्ये आहे हा खरा हीरो, आजारी आईची करायचा सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:06 IST

Pradip Kabra: 'सूर्यवंशी', 'सिम्बा', 'डेल्ही बेली' सारख्या अनेक उत्तम बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता प्रदीप काब्राचे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत, जे आपल्या आईसाठी जीव देणाऱ्या मुलाची कहाणी सांगतात.

'सूर्यवंशी', 'सिम्बा', 'डेल्ही बेली' सारख्या अनेक उत्तम बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता प्रदीप काब्राचे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत, जे आपल्या आईसाठी जीव देणाऱ्या मुलाची कहाणी सांगतात. प्रदीप काब्रा(Pradip Kabra)ने तमीळ चित्रपटसृष्टीत स्वतःचे चांगले नाव कमावले असले तरी, त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही उत्कृष्ट काम केले आहे. चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा प्रदीप खऱ्या आयुष्यातही एखाद्या हीरोपेक्षा कमी नाही.

'वॉन्टेड', 'दिलवाले', 'बागी' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसलेला प्रदीप काब्रा प्रसिद्धीपासून दूर राहतो. चित्रपटांव्यतिरिक्त, प्रदीप आपला सर्व वेळ त्याच्या आईची सेवा करण्यात घालवतो. खरंतर, प्रदीपच्या आईला १० वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता आणि तेव्हापासून प्रदीपने हार मानली नव्हती. तो त्याच्या आईला बरे करण्यासाठी प्रयत्न करत होता.

प्रदीप काब्राने काही वर्षांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो आईला खांद्यावर घेऊन फिरत होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले होते की, आई तू मला चालायला शिकवलेलंस ना.... त्यामुळे आता तुला चालता येत नाही तर मी तुझे पाय बनतो. प्रदीपने त्याच्या आईच्या थेरपी सेशनवर देखील कठोर परिश्रम घेतले. २०२३ मध्ये प्रदीपच्या आईचं निधन झालं आणि तो एकटा पडला. त्यानंतर त्याने स्वत:ला कामात व्यग्र करून घेतले.