Join us  

‘पद्मावत’नंतर ‘छपाक’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 2:27 PM

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधण्याआधीच मेघना गुलजारचा एक चित्रपट साईन केला होता. लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवनसंघर्ष पडद्यावर दाखवणार आहे.

ठळक मुद्दे  आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’मध्ये  प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तो  लक्ष्मीचा पती आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय. स्वत: मेघना गुलजारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधण्याआधीच मेघना गुलजारचा एक चित्रपट साईन केला होता. लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवनसंघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाचे नावही गुलदस्त्यात होते. पण आता या चित्रपटाचे शीर्षक ठरले आहे. होय, मेघना गुलजार दिग्दर्शित  या चित्रपटाचे ‘छपाक’असे नामकरण करण्यात आले आहे. म्हणजेच ‘पद्मावत’नंतर दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाचा हिरो कोण होणार, यावरून बरीच चर्चा झाली. आयुष्यमान खुराणा आणि राजकुमार राव यांच्यात या भूमिकेसाठी रस्सीखेच सुरु होती. यादरम्यान राजकुमारचे नाव फायनल झाल्याचे वृत्त होते. पण आता एक नवी बातमी आहे. होय, ‘छपाक’मध्ये दीपिकाच्या अपोझिट विक्रांत मेस्सीची वर्णी लागल्याचे कळतेय.

  आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’मध्ये  प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तो  लक्ष्मीचा पती आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय. स्वत: मेघना गुलजारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांचेही लग्न झाले. मेघना गुलजार  ‘राजी’,‘तलवार’अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या ‘राजी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. ‘राजी’नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय.  

टॅग्स :दीपिका पादुकोणविक्रांत मेसी