Join us  

तर ती मला क्लॅप बॉय बनवेल...! कंगना राणौतबद्दल बोलले विक्रम भट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:28 AM

कंगनाशी कोण घेणार ‘पंगा’?

ठळक मुद्देशिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशात परतली आहे. 

कंगना राणौत सध्या जाम चर्चेत आहे. ठाकरे सरकारसोबतच्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगनाची जोरदार चर्चा आहे. कंगना तशी स्वभावाने परखड. आपल्या या परखड स्वभावामुळे आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक वाद ओढवून घेतले आणि या वादांना पुरून उरली. यानंतर काय तर पंगा घेणारी अभिनेत्री अशीच तिची ओळख बनली. तिच्या या स्वभावामुळे बॉलिवूडचे काही दिग्दर्शक-निर्माते जाणीवपूर्वक कंगनापासून दूर राहतात, हे एक वास्तव आहे. दिग्दर्शक विक्रम भटही यापैकी एक.नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट यांना कंगनाबद्दल छेडले गेले. वादांच्या पार्श्वभूमीवर कंगनासोबत काम करण्याची संधी मिळाल्यास करणार का? असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर विक्रम यांनी अनोखे उत्तर दिले.‘मी तिच्यासोबत काय काम करणार? आजकाल ती स्वत:च सिनेमे दिग्दर्शित करतेय. मी तिच्यासोबत काम करणारच नाही, असे मी म्हणणार नाही. पण मी तिच्यासोबत करणार काय? तिच्यासोबत सिनेमा केला तर मला चित्रपटात क्लॅप मारावी लागेल. म्हणजे मी क्लॅप बॉयच्या भूमिकेत असेन. कारण कंगना स्वत:चा कथा लिहिते, स्वत:च दिग्दर्शित करते, अशात मला कामच उरणार नाही,’ असे विक्रम भट म्हणाले.

कंगनाला काम मिळत राहिल...अलीकडे कंगना ज्या सिनेमात काम करतेय, ते सिनेमे तिने स्वबळावर मिळवलेत. सर्वांसाठी कोणी ना कोणी असतोच. सर्व मिळून कंगनाला बॉयकॉट करतील, हे शक्य नाही. कंगनाला काम मिळत राहील, असेही विक्रम भट म्हणाले.

महेश भट यांनी कंगनावर साधला निशाणा; युजर्स म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही...!

तुझ्या वडिलांना हे प्रश्न सुद्धा विचार...! ट्विटरवर कंगना राणौत- पूजा भटमध्ये घमासान

जो चलता है, उसके पीछे दुनिया भागती है...मी इंडस्ट्रीत कधीच कोणाचा द्वेष वा राजकारण केले नाही. तुम्ही व्यक्तिसोबत नाही तर त्याच्या प्रतिभेसोबत काम करता. फिल्म इंडस्ट्रीत सगळे उगवत्या सूर्याला नमस्कार करता. जे विकल्या जाते, त्याच्यामागे सगळे पळतात. आयुष्यमान खुराणा आधी काही नव्हता. आज त्याला साईन करण्यासाठी रांगा लागतात, असेही ते म्हणाले.

वाय दर्जाच्या सुरक्षेवर कंगनाचे उत्तरशिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशात परतली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि ड्रग्सच्या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केल्याने कंगना व शिवसेना यांच्यात वादाला तोंड फुटले होते. मुंबई मला असुरक्षित वाटत असल्याचे विधान तिने केले होते. यानंतर केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान या सुरक्षेसाठी केंद्र सरकार दहमहा लाखो रूपये खर्च करत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील वकील ब्रिजेश कलाप्पा यांनी कंंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला होता. एखाद्या व्यक्तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यासाठी   केंद्राला महिन्याला 10 लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणा-या लोकांचा आहे. कंगना आता हिमाचल प्रदेशात सुरक्षित आहे. अशा स्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का? अशी विचारणा या वकिलाने केली होती. ब्रिजेश यांच्या प्रश्नाला कंगनाने उत्तर दिले आहे. ‘ब्रिजेशजी, मी काय विचार करते, तुम्ही काय विचार करता या आधारावर संरक्षण दिले जात नाही. इंटेलिजन्स ब्युरोकडून संभाव्य धोक्याचा तपास केला जातो. त्या धोक्याच्या आधारावर कुठल्या दर्जाचे संरक्षण पुरवायचे याचा विचार केला जातो. ईश्वराची इच्छा असेल तर पुढच्या काही दिवसांत मला दिलेले संरक्षण पूर्णपणे हटवल जाईल. मात्र इंटेलिजन्स ब्युरोकडून खराब रिपोर्ट मिळाला तर कदाचित माझी सुरक्षा वाढवली जाईल,’ असे उत्तर कंगनाने दिले.

 

टॅग्स :कंगना राणौतविक्रम भट