Join us  

तुम लोगों का हिसाब होगा...! विकास बहलला क्लिनचीट मिळताच भडकली रंगोली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 10:04 AM

दिग्दर्शक विकास बहल मीटू मोहिमेंअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला होता. पण कालच या प्रकरणात त्याला क्लिनचीट मिळाली. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. कंगना राणौतची बहीण रंगोली हिने यासंदर्भात नेहमीप्रमाणे जळजळीत प्रतिक्रिया दिली.

ठळक मुद्दे२०१८ मध्ये सुरू झालेल्या मीटू मोहिमेअंतर्गत विकास बहलचे नाव समोर आले होते.

दिग्दर्शक विकास बहलमीटू मोहिमेंअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला होता. पण कालच या प्रकरणात त्याला क्लिनचीट मिळाली. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. कंगना राणौतची बहीण रंगोली हिने यासंदर्भात नेहमीप्रमाणे जळजळीत प्रतिक्रिया दिली. रंगोलीने दोन ट्वीट केलेत. पहिल्या ट्वीटमध्ये रंगोलीने संपूर्ण भडास काढली.

‘आलोकनाथनंतर विकास बहल यालाही क्लिनचीट मिळाली. ज्या महिलांसोबत काही चुकीचे होते, त्यांना आयुष्यभर लाजीरवाण्या स्थितीचा सामना करावा लागतो. फिल्म पिटी थी, ये भी पिटेगी, असे बॉलिवूडमध्ये म्हटले जाते,’ असे पहिल्या ट्वीटमध्ये रंगोलीने म्हटले.

 

‘तुमच्या कृत्यांचा हिशेब चुकता होईल. या जगाच्या बाहेरही एक जग आहे. जिथे महिलांच्या किंचाळ्या दुर्लक्षित होत नाहीत, ’ असे रंगोलीने दुस-या ट्वीटमध्ये म्हटले.

काय होते आरोप

२०१८ मध्ये सुरू झालेल्या मीटू मोहिमेअंतर्गत विकास बहलचे नाव समोर आले होते. २०१५ मध्ये आलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका महिला सहका-यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. फँटम फिल्म्समध्ये विकासचे पार्टनर अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनीही ही घटना घडल्याचे मान्य केले होते. यानंतर विकासने त्याचे साथीदार अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मंटेना यांच्यावर चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत १० कोटी रुपयेही मागितले होते. विकासवर लैंगिक शोषणाचा आरोप लागल्यामुळे त्याच्यावर सिनेसृष्टीत बंदी घालण्यात आली होती. रिलायन्स एण्टरटेनमेन्टने विकासवर करण्यात आलेल्या आरोपांवर एक समिती नेमली होती. या समितीने विकासची निर्दोष सुटका केली. विकासची सर्व आरोपांतून सुटका झाल्यामुळे प्रोडक्शन हाऊसचे सीईओ शिबाशीश सरकारने हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक विकासच असेल अशी घोषणा केली.

टॅग्स :विकास बहलकंगना राणौतमीटूरांगोळी