Join us  

करीना कपूरच्या या अदांवर फिदा झाला विजय वर्मा, म्हणाला - "संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 9:37 AM

Kareena Kapoor-Vijay Varma : करीना कपूर आणि विजय वर्मा यांचा 'जाने जान' हा चित्रपट २१ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. नुकतेच अभिनेत्यानेने 'जाने जान'मध्ये बेबोसोबत कामाचा अनुभव शेअर केला आहे.

बॉलिवूडची बेबो करीना कपूर(Kareena Kapoor)ने तिच्या वाढदिवसादिवशी म्हणजे २१ सप्टेंबरला 'जाने जान' या चित्रपटाद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. क्राइम-थ्रिलर चित्रपट 'जाने जान' (Jaane Jaan) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. 'जाने जान'चे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.

विजय वर्माने 'जाने जान'मध्ये करीना कपूरसोबत कामाचा अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीत विजय म्हणाला की, करीना एक अभिनेत्री म्हणून तिच्या स्विच ऑफ आणि ऑन करण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखली जाते. रात्रीच्या जेवणानंतर तो अनेकदा करीनाशी जेवणाविषयी बोलत असे कारण तो त्याचा आवडता विषय होता. आमच्या संवादादरम्यान, दिग्दर्शक सुजॉय घोषने तिला सांगितले की शॉट तयार आहे, तर ती लगेच भूमिकेत यायची.

''रात्री झोपणे कठीण झाले होते कारण...''विजयने सांगितले की, करीना आता खूप बदलली आहे, ती एक मोठी स्टार आहे पण खूप डाउन टू अर्थ आहे. विजयने सांगितले की, करीनासोबत शूटिंग केल्यानंतर त्या रात्री तो झोपू शकला नाही, करीना कपूर तिच्या हिरव्या डोळ्यांनी संपूर्ण खोली उजळून टाकते. तिचा चार्म वेगळाच आहे आणि हे पाहणे सुंदर वाटत होते.

''...घाम फुटला होता''दुसऱ्या एका मुलाखतीत विजयने सांगितले की, करीना कपूरसोबत इंटीमेट सीन करताना त्याला घाम फुटला होता. तो खूप घाबरला. तसेच, जेव्हा करीना त्याच्या आणि जयदीप अहलावतच्या कामाची प्रशंसा करायची तेव्हा दोघांनाही लाज वाटायची. विजय म्हणतो की, मी करिनाचे चित्रपट पाहिले आहेत, तिच्यासाठी शिट्टी वाजवली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ती आपली स्तुती करते तेव्हा आमची बोलती बंद व्हायची.

टॅग्स :करिना कपूर