Join us  

‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 12:34 PM

या सिनेमाच्या माध्यमातून विद्या तेलुगू सिनेमात पदार्पण करणार आहे. सध्या या सिनेमाचे हैदराबादमध्ये चित्रीकरण सुरू असून या चित्रीकरणादरम्यान विद्याने हा फोटो शेअर केल्याचे बोललं जात आहे.

वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार तितक्याच संवेदनशील भूमिका साकारत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विविध सिनेमांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवलं आहे. 'डर्टी पिक्चर' सिनेमा असो किंवा 'कहानी', 'पा असो' किंवा 'भुलभुलैय्या' अशा कित्येक सिनेमात विद्याने आपल्यातील अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. 'डर्टी पिक्चर' या सिनेमात तिने सिल्क स्मितावर आधारित व्यक्तीरेखा साकारली होती. आता विद्या पुन्हा एकदा नव्या बायोपिकसाठी सज्ज झाली आहे. 

सुपरस्टार एन.टी. रामाराव अर्थात एनटीआर यांच्या जीवनावरील बायोपिकमध्ये विद्या बालन प्रमुख भूमिका साकारणार आहे. कथानायकुडू असं या एनटीआर यांच्या जीवनावरील सिनेमाचं नाव असून या सिनेमातील विद्याचा लूक समोर आला आहे. विद्यानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा लूक शेअर केला आहे. यांत विद्या एका आरशासमोर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विद्याने लाल रंगाची किनार असलेली पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून दाक्षिणात्या पद्धतीनुसार केसात मोगऱ्याचा गजराही माळला आहे. तिचा हा लूक आणि चेहऱ्यावरील हावभाव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमात विद्या एनटीआर यांची पहिली पत्नी बसवातारकम यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विद्या तेलुगू सिनेमात पदार्पण करणार आहे. सध्या या सिनेमाचे हैदराबादमध्ये चित्रीकरण सुरू असून या चित्रीकरणादरम्यान विद्याने हा फोटो शेअर केल्याचे बोललं जात आहे. 

या सिनेमात अभिनेत्री रकुलप्रीत ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची भूमिका साकारणार असून काही दिवसांपूर्वी तिचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. याशिवाय बाहुबली फेम राणा डग्गुबाती या सिनेमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू तर अभिनेता सचिन खेडेकर राजकारणी भास्करराव यांची भूमिका 6 साकारणार आहे. बंगाली सिनेसृष्टीतील अभिनेता जिसू हा दादासाहेब फाळके पुरस्कारविजेत्या एल.व्ही.प्रसाद यांची भूमिका साकारणार आहे. क्रिश. जे. या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून एन. बाळकृष्णन, विष्णू इंदुरी आणि साई कोरापती याची निर्मिती करणार आहेत. 

टॅग्स :विद्या बालन