Join us  

१५ वर्षांची असताना पडली प्रेमात, काही महिन्यातच ब्रेकअप, विद्या बालनने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:44 AM

अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

प्रचंड संघर्षानंतर सिने जगतात यश मिळविणारी अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट व हटके चित्रपट केले आहे. विद्या बालन आणि प्रतीक गांधी सध्या त्यांच्या आगामी 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोफेशनल लाईफप्रमाणे विद्याच्या खासगी आयुष्याचीही प्रचंड चर्चा होते. विद्या १५ वर्षांची असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती, याचा खुलासा तिने स्वत:च एका मुलाखतीत केला आहे. 

 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन आणि अभिनेता प्रतीक गांधीने इन्स्टंट बॉलीवूडला मुलाखत दिली. यावेळी पहिल्या प्रेमाबद्दल प्रश्न विचारताच विद्या म्हणाली, 'मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा मी १५ वर्षांची होते. ते फक्त आकर्षण होतं आणि प्रेम नव्हतं. पण तेव्हा मला वाटायचं की, मला माझं प्रेम मिळालं आहे. आता याच्याबरोबरच लग्न, याच्याबरोबरच आयुष्य घालवणार आणि हेच माझं नशीब आहे. नंतर काही दिवसांनी मला त्याची वेगळीच बाजू दिसली आणि मला ते आवडलं नाही, पटलं नाही, मग मी त्याचा विचार सोडून दिला'.

हार्टब्रेकबद्दल बोलताना विद्या बालन म्हणाली, 'मी ज्या मुलाला पहिल्यांदा डेट केलं होतं. त्याने माझं हार्टब्रेक केलं, कारण त्याने मला फसवलं होतं. आमचं नुकतचं ब्रेकअप झालं होतं. व्हॅलेन्टाईन्स डेला तो मला कॉलेजमध्ये दिसला. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. तो मला म्हणाला की, मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडबरोबर डेटला जातोय. मी यावर त्याला ओके म्हटलं. कारण तेव्हा मला खूप त्रास झाला होता. तेव्हा मला किती वाईट वाटलं होतं, हे मी सांगूही शकत नाही'.

 'दो और दो प्यार' हा सिनेमा 19 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्या बालनसह इलियाना डिक्रूज, प्रतिक गांधी (Pratik Gandhi) आणि सेंथिल राममूर्ती आदींच्या भूमिका आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अप्लॉज एंटरटेन्मेंटसह एलिप्सिस एंटरटेन्मेंट प्रोडक्शन अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  

टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटीबॉलिवूड