Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूला इतका जबरदस्त घाबरायचा सुशांत सिंग राजूपत, व्हिडीओतून झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 16:58 IST

सुशांत सिंग राजपूत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे.

 सुशांत सिंग राजपूत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे. सुशांतचे काही जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर येतायेत. सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता अशी चर्चा आहे. पण ज्या सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली तोच सुशांत मृ्त्यूला सगळ्यात जास्त घाबरायचा असा खुलासा स्वत: त्याने एका मुलाखती दरम्यान केला होता. 

ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा सुशांतला विचारतात की तुला आयुष्यात कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. यावर उत्तर देताना सुशांत म्हणाला होता कदाचित मृत्यूला, कारण मी जेव्हा तीन तास झोपतो तेव्हा मला माहिती नसते की मी कोण आहे. आपण कोण आहात, हे आपल्याला माहित नसते तेव्हा ते थोडे भयानक असते. जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्या बाबतीतही असेच होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने 'किस देस में है मेरा दिल' या मालिकेत काम केले. त्यानंतर त्याने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम केले. या मालिकेतील मानव हे पात्र विशेष गाजले. ‘काय पो चे’, 'छिछोरो', 'एम एस धोनी' या सिनेमा दमदार भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत