Join us  

Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:54 AM

या अभिनेत्रीने म्हटले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." याच बरोबर या अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत.

मुंबई - 'बिग बॉस 14' फेम राखी सावंतने (Rakhi sawant) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पीपीई सूट घालून भाजीपाला खरेदी करताना दिसत आहे. राखीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात, तीने फिकट निळ्या रंगाच्या पीपीई सूटसोबतच हँडग्लोज आणि मास्कदेखील घातल्याचे दिसते. (Video Rakhi sawant seen vegetable shopping in ppe suit)

या व्हिडिओसोबत राखीने लिहिले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत.

खरे तर, राखीचा अंदाज नेहमीच वेगळा असतो. तसाच तिचा हा अंदाजही वेगळाच आहे. मुळात, बाहेर पडताना राखीने ज्या पद्धतीने कोरोनापासून बचावाचा प्रयत्न केला आहे. त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांनीही कोरोनापासून बचावाचा प्रयत्न करायला हवा.

याच बरोबर, राखी सावंतने पती रितेशसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. राखी सावंतने आपल्या कॅन्सरशी संघर्ष करत असेल्या आईची शपथ खात खरोखरच तिचा पती रितेश असल्याचे म्हटले होते. तसेच आमचे लग्न नेमके कोणत्या मार्गावर जात आहे, हे आपल्याला माहित नाही, असेही ती म्हणाली होती. 

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूडबिग बॉस