Join us

Video : ​‘क्वांटिको3’च्या सेटवर धावत्या गाडीतून पडली प्रियांका चोप्रा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 14:09 IST

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या तिसºया सीझनच्या शूटींमध्ये प्रियांका व्यस्त आहे. ...

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या तिसºया सीझनच्या शूटींमध्ये प्रियांका व्यस्त आहे. पण याच सीझनच्या सेटवर एक अपघात झालायं. या अपघातात प्रियांका चालत्या कारमधून पडलीयं. ‘क्वांटिको’च्या सेटवरचा या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अर्थात घाबरू नका. कारण प्रियांकाला काहीही झालेले नाही. कारण या व्हिडिओतील कार रस्त्यावर धावत नसून केवळ या गाडीमागची स्क्रिन धावत आहे. आता हा व्हिडिओ निव्वळ गमतीचा भाग आहे, हे तुम्हाला सांगायला नकोच.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.प्रियांकाच्या टीमने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात प्रियांका तिचा को-स्टार रोशेलसोबत दिसतेय. प्रियांका एका चालत्या गाडीच्या दरवाज्यावर लटकलेली आहे आणि को-स्टार रोशेल टॉवेसोबत फाईट करतेय. या फाईटदरम्यान स्वत:चा बचाव करण्याच्या प्रयत्नात प्रियांका गाडीतून पडते, असे या व्हिडिओत दिसते. पण मजेदार गोष्ट म्हणजे, प्रियांका चालत्या गाडीतून नाही तर थांबलेल्या गाडीतून पडतेय. कारण प्रियांकाची गाडी धावत नाहीयं तर तिच्या मागची स्क्रिन धावते आहे. हा व्हिडिओ तुम्हीही बघा आणि तो कसा वाटला, हे आम्हाला जरूर कळवा.अलीकडे प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. अलीकडे प्रियांकाने आणखी तीन हॉलिवूड सिनेमे हातावेगळे केले.  तूर्तास प्रियांकाकडे एकही बॉलिवूड प्रोजेक्ट नाही. पण पीसीचे भारतीय चाहते तिला पाहण्यास आतूर आहे. मध्यंतरी प्रियांका पी.टी. उषा हिच्या बायोपिकमध्ये झळणार अशी बातमी होती. अर्थात प्रियांकाने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. प्रियांका शेवटची ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दिसली होती. तेव्हापासून ती हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे.  हॉलिवूड चित्रपटांसह स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसच्या प्रोजेक्टमध्येही प्रियांका बिझी आहे. याशिवाय सींगिंगवरही तिने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे ‘यंग अ‍ॅण्ड फ्री’ असे शीर्षक असलेले प्रियांकाचे सिंगल रिलीज झाले आहे.े आॅस्ट्रेलियाचा डीजे विल स्पार्क या गाण्यात तिच्यासोबत दिसला होता.