Join us  

Rahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खान नशेत तर्र! क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ, झाले ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:09 PM

Rahat Fateh Ali Khan : होय, राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. या व्हिडीओत राहत दारूच्या नशेत तर्र दिसत आहेत.

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान ( Rahat Fateh Ali Khan) पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये आहेत. होय, कालचीच (16 ऑगस्ट) गोष्ट, फतेह अली खान यांनी  काका उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत एक पोस्ट शेअर केली होती. मात्र या पोस्टला 24 तासही उलटत नाही तोच, राहत फतेह अली खान सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आलेत.

होय, त्यांचा एक व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. आता या व्हिडीओत असं काय आहे तर राहत फतेह अली खान दारूच्या नशेत तर्र दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि मग काय, अनेकांनी राहत फतेह अली खान यांना ट्रोल करायला सुरूवात केली.

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांच्या दर्दी आवाजाचे जगभर चाहते आहेत. पण आता याच राहत फतेह अली खान यांचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप होत आहे.व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान त्यांचे काका नुसरत फतेह अली खान यांच्या मॅनेजरबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ बघता, ते नशेत आहेत हे स्पष्ट दिसते. त्यांची ही अवस्था बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राहत हे प्रसिद्ध कव्वाली गायक फारुख अली खान यांचे पुत्र आणि नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत.  राहत यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.  जग सुना सुना लागे, तेरी ओर, आज दिन चढेया, ओ रे पिया,  तेरे बिन, जरुरी था, आफरीन यांसारख्या त्यांच्या लोकप्रिय गाण्यांनी बॉलिवूडच्या प्रेक्षकांना वेड लावलं.      

टॅग्स :बॉलिवूडपाकिस्तानसेलिब्रिटी