Join us  

Video: कॉन्सर्टमध्ये एड शीरनने गायलं पंजाबी गाणं, दिलजीत दोसांझसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 12:03 PM

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एड शीरनने गायलेलं 'हे' पंजाबी गाणं नक्की ऐका...

'शेप ऑफ यू' या गाण्याने खळबळ माजवणाराऱ्या गायक एड शीरनचे जगाच्या कानाकोपऱ्यात चाहते पाहायला मिळतात. त्याची अदा, त्याची स्टाइल, त्याचा या सर्वच गोष्टींचं चाहत्यांना कुतुहल असतं. केवळ चाहत्यांमध्येच नाही सिनेइंडस्ट्रीतल्या दिग्गज सेलिब्रेटींमध्येही त्याची क्रेझ दिसून येते. एड शीरन सध्या भारतात आला आहे. नुकतेच त्याने कॉनसर्टमध्ये चक्क पंजाबी गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ दिलजीत दोसांझने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

एड शीरनच्या 2024 मधील आशिया आणि युरोप टूरचा एक भाग म्हणून 16 मार्च रोजी मुंबईत त्याचा शो झाला. यावेळी एड शीरनने दिलजीत दोसांझसोबत पंजाबी गाणं गायलं. त्यामुळे त्याची भारतातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांकडून पसंत केला जात आहे. या सिंगिंग नाईटसाठी दिलजीत हा काळ्या शर्ट आणि लाल पगडीमध्ये दिसला. एड शीरनने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम परिधान केलं होतं. एडने दिलजीतसोबत 'लवर' हे गाणे तर गायलंच. सोबतच गिटारही वाजवली. अमेरिकन गायकाला पंजाबीमध्ये गाताना पाहून भारतीय चाहते आणि सेलिब्रिटी खूप प्रभावित झाले आहेत.

 एड शीरनने भारतात आल्यावर शाहरूखची भेट घेतली. तसेच त्याने शाहरुखसोबत त्याचे सिग्नेचर स्टेप देखील केले, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे. एड शीरनची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. 'शेप ऑफ यू' या गाण्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर परदेशीच नाही तर देशी चाहत्यांची संख्याही वाढली. मुंबईत परफॉर्म करण्याची त्याची ही दुसरी वेळ होती. याआधी 2017 मध्ये त्यांचा पहिला कॉन्सर्ट भारतात झाला होता.

टॅग्स :दिलजीत दोसांझहॉलिवूडबॉलिवूडमुंबईसेलिब्रिटी