Join us  

Video: भाईजान सलमान खानने लावली घोड्यासोबत ‘रेस’; पाहा, कुणाचा झाला विजय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 5:25 AM

कुण्या व्यक्तिला घोड्यासोबत शर्यत लावताना तुम्ही पाहिलेय? घोड्यासोबत रेस लावणा-यास अनेक जण वेड्यात काढतील, पण भाईजान सलमान खानची बातचं काही न्यारी.

कुण्या व्यक्तिला घोड्यासोबत शर्यत लावताना तुम्ही पाहिलेय? घोड्यासोबत रेस लावणा-यास अनेक जण वेड्यात काढतील, पण भाईजान सलमान खानची बातचं काही न्यारी. त्याने चक्क घोड्यासोबत शर्यत लावली आणि विशेष म्हणजे, या शर्यतीत जिंकलाही. सध्या या अनोख्या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधी शूट झाला, हे माहित नाही. पण सध्या या व्हिडिओने सगळ्यांना वेड लावलेय, इतके मात्र नक्की. ALSO READ : सलमान खानचा ‘रेस3’ : बॉक्सआॅफिसवर पैशांचा तर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस!तसेही सलमान खान वर्कआऊटच्या बातमीत वेगवेगळ्या गोष्टी करतो. याचाच एक भाग म्हणजे, ही घोड्यासोबतची शर्यत. व्हिडिओत सलमान आणि घोड्यासोबत धावताना दिसतो आणि घोड्याच्या अगदी काहीक्षण आधी फिनिश लाईनपर्यंत पोहोचतो, असे दिसतेय. या व्हिडिओच्या मागे ‘सुल्तान’मधील गाणे वाजतेय. त्यामुळे हा व्हिडिओ ‘सुल्तान’च्या शूटवेळी शूट केला गेलेला नक्कीच नाही. व्हिडिओतील सलमानचे लूक बघता, अलीकडेचं तो शूट झाला असावा असे दिसतेय. पण व्हिडिओतील थरार निश्चितपणे पाहण्यासारखा आहे.
सलमानने अनेक चित्रपटांत घोडेस्वारी केली आहे. अलीकडे आलेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातही तो घोडेस्वारी करताना दिसला होता. आता तर तो घोड्यांसोबत शर्यतही करायला लागला आहे. एकंदर काय तर भाईजान ‘जोरात’ आहेत.
नुकताच सलमानचा ‘रेस3’ रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईचे अनेक विक्रम तोडले आहेत. मंगळवरपर्यंत म्हणजे रिलीजनंतरच्या पाच दिवसांत या चित्रपटाने १३२़७६ कोटींचा गल्ला जमवला. केवळ तीनचं दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला. एकट्या मंगळवारी या चित्रपटाने १२ कोटी कमावले. २०१८ मधील सर्वात मोठी ओपनर फिल्मचा रेकॉर्डही या चित्रपटाने स्थापित केला. खरे तर समीक्षकांनी या चित्रपटाला फार दाद दिली नाही. पण तरिही सलमानच्या चाहत्यांनी या चित्रपटाला कमालीची पसंती दिली.