Join us  

विकी कौशल भारतीय जवानांसोबत घालवतोय वेळ, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 5:38 PM

विकी कौशल आता भारत-चीन सीमेवरील सैनिकांसोबत काही दिवस राहाणार आहे. विकीच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्याने ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देविकीने इन्सटाग्रामवर काही सैनिकांसोबत त्याचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये १४ हजार फूट उंचीवर भारत-चीन सीमेवर जवानांसोबत काही दिवस राहाण्याची संधी मिळाली.

उरी : द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या सुपर हिट चित्रपटातील विकीच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात त्याने भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारल्यानंतर आता सैनिकांचे जीवन कसे असते हे जवळून पाहाण्याचे विकीने ठरवले आहे. 

विकी कौशल आता भारत-चीन सीमेवरील सैनिकांसोबत काही दिवस राहाणार आहे. विकीच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशाच्या तवांगमध्ये भारत-चीन सीमेवर तो जवानांसोबत वेळ घालवणार आहे. विकीने इन्सटाग्रामवर काही सैनिकांसोबत त्याचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये १४ हजार फूट उंचीवर भारत-चीन सीमेवर जवानांसोबत काही दिवस राहाण्याची संधी मिळाली.

विकी कौशल आता देशातील पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. या बायोपिकचं नाव सैम असं आहे. सैम बायोपिकमधील विकी कौशलचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. यात तो हुबेहूब मानेकशॉ यांच्यासारखा दिसत होता. या बायोपिकचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. या चित्रपटावर सध्या विकी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तो प्रचंड तयार करत आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहे. 

विकी कौशलने यापूर्वी २०१८ साली आलिया भटसोबत राझी चित्रपटा काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारचे होते. मेघना गुलजारने सांगितलं की, राझीच्या शूटिंगदरम्यान तिने विकी कौशलसोबत सैम मानेकशॉ यांच्या कथेवर चर्चा केली होती आणि चित्रपटाचा ड्राफ्ट तयार झाल्यानंतर विकीला स्क्रिप्ट वाचायला दिली होती. विकी कौशलचं म्हणणं आहे की, त्याने जेव्हा १९७१ साली भारत-पाकिस्तानच्या युद्धाबाबत वाचले होते त्यावेळी मानेकशॉ यांच्या धाडसी आणि शूरतेबद्दल त्याला समजलं होतं.

टॅग्स :विकी कौशलउरी