Join us  

सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते, दिग्दर्शक विशू यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:24 AM

तामिळ सिनेसृष्टीत शोककळा

ठळक मुद्देअभिनेते एस. व्ही शेखर यांनी विशू यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

तामिळ इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक विशू यांचे रविवारी चेन्नईत निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. विशू काही दिवसांपासून आजारी होते. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने तामिळ सिनेमा जगतात शोकाचे वातावरण आहे.विशू यांनी ‘कुडुमबम ओरू कडमबम’ या सिनेमातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.

एस. मुथुरमन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कालांतराने त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या करिअरमध्ये त्यांनी काही उत्तम सिनेमे बनवलेत. संसारम अथु मिनसारम, चिदंबरा रहस्यम, पेनामनी अवल कनमनी, केट्टी मेलम, वा मागले वा अशा चित्रपटांचा यात समावेश आहे. अभिनेते एस. व्ही शेखर यांनी विशू यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. ‘विशू माझ्या मोठ्या बंधूसारखे होते. मला नाटकात संधी देणारे ते पहिले होते. मी त्यांच्यासोबत 20 चित्रपटांत काम केले आणि हे सर्व सिनेमे हिट झालेत. विशू यांचा कॉमिक सेन्स जबरदस्त होता,’ असे त्यांनी लिहिले. 

टॅग्स :Tollywood