Join us  

 दु:खद ! बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:21 PM

विशाल आनंद यांचे खरे नाव भीष्म कोहली आहे.

ठळक मुद्देविशाल आनंद यांना म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्या यशाचे श्रेय दिले जाते.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 4ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘चलते चलते’ या यादगार सिनेमात दमदार भूमिका साकारणारे विशाल आनंद यांचे खरे नाव भीष्म कोहली आहे.  बॉलिवूडच्या 11 चित्रपटांमध्ये त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. निर्माते- दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. 

आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये विशाल आनंद यांनी अशोक कुमार, सिमी ग्रेवाल, मेहमूद अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले.

 चलते चलते, सारे गामा, दिल से मिले दिल आणि टॅक्सी ड्राइव्हर  हे विशाल आनंद यांचे काही यादगार सिनेमे. त्यांचा ‘चलते चलते’ हा सिनेमा विशेष गाजला. यात त्यांनी सिमी ग्रेवालसोबत काम केले. या चित्रपटाचे ते निर्माते देखील होते.

विशाल आनंद यांना म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्या यशाचे श्रेय दिले जाते. कारण विशाल आनंद यांनीच बप्पी दा यांना पहिला मोठा ब्रेक दिला होता.

 

टॅग्स :बॉलिवूड