Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 9:26 AM

भैरवी वैद्य यांनी गुजराती आणि हिंदी सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांचं निधन झालं आहे. त्या ६७ वर्षाच्या होत्या. गेल्या ४५ वर्षांपासून त्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी अनेक टीव्ही शो, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. भैरवी या गेल्या ६ महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र त्यांची कॅन्सरशी लढाई अपयशी ठरली. ८ ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भैरवी वैद्य यांनी गुजराती आणि हिंदी सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या निमा डेंझोग्पा मध्ये त्यांची भूमिका होती. याशिवाय 'हसरते' आणि 'माहीसागर' सारख्या मालिकांमध्येही त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यांनी ऐश्वर्या रायच्या 'ताल' आणि सलमान खानच्या 'चोरी चोरी चुपके चुपके' सिनेमात भूमिका साकारली आहे. त्या प्रसिद्ध गुजराती थिएटर अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक लोकप्रिय गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. 

स्कॅम फेम अभिनेता प्रतीक गांधीने भैरवी वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने अभिनेत्रीसोबत 'व्हेंटिलेटर' सिनेमात काम केले होते. तो म्हणाला,'मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आमचं खूप छान बाँडिंग झालं होतं. त्या खूपच प्रेमळ होत्या. लहानपणापासून मी त्यांना स्टेजवर परफॉर्म करतानाही बघितले आहे. मालिकेत बघितलं आहे. मी त्यांच्या कामाचा चाहता आहे. त्यांचा हसरा चेहरा कायम स्मरणात राहील.'

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू