Join us  

Watch Video : न बोलवता अचानक लग्नात पोहोचला रणवीर सिंग! नवरा-नवरीही झाले अवाक्!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:13 AM

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग म्हणजे भन्नाट रसायन. सुपरस्टार असूनही पाय जमिनीवर असलेला अभिनेता. तूर्तास रणवीर आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान रणवीरने असे काही केले की, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ठळक मुद्देसाक्षात रणवीरला पाहून सगळेच उत्साहित झालेत. नवरा-नवरी तर विचारू नका. रणवीरने नवरा-नवरीचे हात हातात घेत, त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. नंतर पाहुण्यांसोबत सेल्फीही काढला. आहे ना रणवीर वेगळे रसायन...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग म्हणजे भन्नाट रसायन. सुपरस्टार असूनही पाय जमिनीवर असलेला अभिनेता. तूर्तास रणवीर आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान रणवीरने असे काही केले की, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. होय, रणवीर न बोलवता अगदी अनपेक्षितपणे एका लग्नात पोहोचला. आता रणवीरसारखा स्टार अचानक तुमच्या लग्नात आला तर, काय होईल? नेमके हेच या लग्नात झाले. लग्नातील वधू-वर तर अवाक् झालेत.

त्याचे झाले असे की, ‘सिम्बा’च्या प्रमोशनदरम्यान रणवीर एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर फोटो काढत होता. यादरम्यान हॉटेलच्या पूल एरियात जावून फोटो काढण्याची इच्छा त्याला झाली. तो लगेच पूल एरियात पोहोचला. पण या पूल एरियात त्यावेळी लग्न सुरू होते. रणवीर पूल एरियाच्या दिशेने येतोय, म्हटल्यावर लग्नातील एका पाहुण्याने त्याला बोलवले. येथे सिंधी लग्न सुरू आहे,रणवीर प्लीज ये...असे हा पाहुणा म्हणाला. मग काय, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता रणवीर लग्नात पोहोचला. साक्षात रणवीरला पाहून सगळेच उत्साहित झालेत. नवरा-नवरी तर विचारू नका. रणवीरने नवरा-नवरीचे हात हातात घेत, त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. नंतर पाहुण्यांसोबत सेल्फीही काढला. आहे ना रणवीर वेगळे रसायन...

या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. तुम्हीही पाहा आणि एन्जॉय करा.रणवीरचा ‘सिम्बा’ येत्या २८ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटातून रणवीर व सारा अली खान यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गत १४-१५ नोव्हेंबरला रणवीर दीपिका पादुकोणसोबत लग्नबंधनात अडकला. इटलीत दोघांनीही लग्नगाठ बांधली. यानंतर लगेच रणवीर ‘सिम्बा’च्या प्रमोशनमध्ये बिझी झाला.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणसिम्बा