Join us  

'सुई-धागा'साठी वरूण धवनने घेतले तीन महिने ह्या गोष्टींचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:20 PM

अभिनेता वरूण धवन व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्देवरूण धवनने घेतले टेलरिंगचे प्रशिक्षण

अभिनेता वरूण धवन व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हे दोघे वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात वरूण टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुष्का गृहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

वरूण धवनने टेलरची भूमिका साकारण्यासाठी तीन महिने टेलरिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. याबाबत तो म्हणाला की, 'माझ्यासाठी हा टास्क खूप कठीण होता. लोकांना मी खरेच मास्टरजी आहे हे पटवून देण्याची कला माझ्याकडे आहे. ड्रेस डिझाइनर दर्शन आणि सेटवरील टेलर नूर भाभी या दोघांनी मला मदत केली. त्यांनी मला तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. माझ्यासाठी टेलरिंग करणे सोपी गोष्ट नव्हती.'सुरुवातीला मला जमत नव्हते. त्यामुळे मी निराश झालो होतो. अनेकवेळा बोटांना सुईने टोचले गेले. मी नव्या तऱ्हेने याचे कौशल्य शिकलो याबद्दल मला बरे वाटते. मला यासाठी तीन महिने लागले. काहीवेळा दोन तास तर काहीवेळा चार तासांचे हे प्रशिक्षण असायचे. यामुळे कॅमेऱ्यासमोर आणि मागे मी आत्मविश्वासाने टेलरिंग करु शकलो. असेही त्याने सांगितले.वरूण आता शिलाई मशिन उत्तमरित्या चालवतो आणि त्याने त्याचे वडील डेविड धवन यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्वतःच्या हाताने शिवलेला शर्ट गिफ्ट केला होता. वरूण धवन 'सुई-धागा' चित्रपटातील वेगळ्या अंदाजातून प्रेक्षकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :सुई-धागावरूण धवनअनुष्का शर्मा