Join us  

 वरुण धवन बनला ‘रूल ब्रेकर्स’; पाहा, फर्स्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 1:56 PM

वरूण धवन -श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या ‘रूल ब्रेकर्स’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे.

ठळक मुद्दे‘एबीसीडी’ सीरिजमधील या आधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते.  बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.

वरूण धवन -श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या ‘रूल ब्रेकर्स’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. होय, ‘रूल ब्रेकर्स’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले आहे. चित्रपटात वरूण धवनश्रद्धा कपूर डान्स फ्लोरवर रूल ब्रेक करताना दिसणार आहेत.वरूण धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचा फर्स्ट लूक  शेअर करत ‘रूल ब्रेकर्स’ याच वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे सांगितले आहे. अर्थात या फोटोत वरूणचा चेहरा पाहायला मिळत नाही. 

येत्या  ८ नोव्हेंबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि वरूण धवनशिवाय प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये सुरूवात झाली. तथापि एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान वरूणच्या गुडघ्याला दुखापतदेखील झाली होती.  अमृतसरमधील फर्स्ट शेड्यूलनंतर दुसºया शेड्यूलसाठी चित्रपटाची टीम लंडनला रवाना होणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल फार माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांचे मानाल तर श्रद्धा यात एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर वरूण एका पंजाबी तरूणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात ‘एबीसीडी’मधील ‘बेगुनाह’ हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे.

‘एबीसीडी’ सीरिजमधील या आधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते.  बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच.

टॅग्स :वरूण धवनश्रद्धा कपूररेमो डिसुझा