Join us

Box Office Collection: 'कांतारा'मुळे नुकसान? वरुणच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'ने पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:27 IST

Dasara Box Office Collection: 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमाची चर्चा होती. परंतु या सिनेमाची कांतारासोबत स्पर्धा असल्याने सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला आहे

वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, याची सर्वांना उत्सुकता होती. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटासमोर ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'चं तगडं आव्हान होतं. त्यामुळे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर एकमेकांसोबत टक्कर होणार, हे उघड होतं. परंतु कांताराच्या रिलीजमुळे 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'च्या बॉक्स ऑफिसवर परिणाम झाल्याचं दिसतंय.

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'ने गुरुवारी पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचा आकडा हा १० कोटींच्या जवळ असला तरी, 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) या चित्रपटाशी असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे वरुण धवनच्या सिनेमाच्या कलेक्शनवर थोडा परिणाम झाला आहे.

वरुण आणि जान्हवीच्या या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने एक महत्त्वाचा विक्रम केला आहे. हा चित्रपट २०२५ मधील दुसरी सर्वात मोठी ओपनिंग करणारा रोमँटिक चित्रपट ठरला आहे. या यादीत 'सैयारा' (₹२१.५० कोटी) हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा चॅप्टर १' या पॅन-इंडिया चित्रपटासोबत मोठी स्पर्धा आहे. 'कांतारा चॅप्टर १' ने पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये अंदाजे ६० कोटींहून अधिकची कमाई करून धमाकेदार सुरुवात केली आहे.

मात्र, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाला वीकेंडमध्ये, म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी अधिक प्रेक्षक मिळण्याची शक्यता असून, कमाई वाढू शकते, असा अंदाज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं आहे.चित्रपटात वरुण - जान्हवीसोबत सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) आणि रोहित सराफ (Rohit Saraf) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे बजेट सुमारे ₹८० कोटी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kantara Impact? Varun's 'Sunny Sanskari...' Earns Modest Rupees on Day One

Web Summary : Varun Dhawan and Janhvi Kapoor's 'Sunny Sanskari...' faced tough competition from 'Kantara Chapter 1', impacting its box office performance. It earned ₹9.25 crore on its opening day, becoming 2025's second-biggest romantic opener. 'Kantara' grossed over ₹60 crore.
टॅग्स :कांताराऋषभ शेट्टीबॉक्स ऑफिस कलेक्शनवरूण धवनजान्हवी कपूरसान्या मल्होत्रा