Join us  

'कलंक' सिनेमात लोहार साकारण्यासाठी वरुणने गाळला घाम, वर्कआऊट करत बनवली पिळदार शरीरयष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 7:56 PM

लोहाराचे शारीरिक काम जास्त असते त्यामुळे त्याचे वजन वाढवल्याचेही त्यांनी सांगितलं. शिवाय वरुणनेदेखील यासाठी बराच घाम गाळला आहे.

ठळक मुद्देआगामी 'कलंक' सिनेमासाठीदेखील तो अशीच मेहनत घेत आहे. कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. वरुणच्या पात्रानुसार त्याचा फिटनेस प्रशिक्षक प्रशांत सावंत त्याच्याकडून कठीण वर्कआउट करून घेत आहे.

कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात. अभिनेता वरुण धवन त्याच कलाकारांपैकी एक. प्रत्येक सिनेमासाठी वरुण बरीच मेहनत घेतो. आगामी 'कलंक' सिनेमासाठीदेखील तो अशीच मेहनत घेत आहे. सिनेमात वरुण रिप्पड बॉडीसाठी भरपूर वर्कआऊट करत आहे. त्यात तो लोहारची भूमिका साकारणार आहे. त्याचे दुकान लाहौर मार्केटमध्ये आहे. ते हिरा मंडीच्या नावावने प्रसिद्ध असते. वरुणच्या पात्रानुसार त्याचा फिटनेस प्रशिक्षक प्रशांत सावंत त्याच्याकडून कठीण वर्कआउट करून घेत आहे. या भूमिकेसाठी वरुणचा लूक गल्लीच्या मुलाप्रमाणे  करण्याचे प्रशांत यांना सांगण्यात आले हाेते. 

लोहाराचे शारीरिक काम जास्त असते त्यामुळे त्याचे वजन वाढवल्याचेही त्यांनी सांगितलं. शिवाय वरुणनेदेखील यासाठी बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले. वरुणची बॉडी आधीच पिळदार होती.

त्याला जाड दिसायचे असल्याने त्याच्या छाती, कमर आणि दंडावर जास्त मेहनत घेतल्याचे प्रशांत यांनी सांगितलं. कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. तो छाती आणि कमरेवर जास्त लक्ष देतो. वजन वाढवण्यासह वरुणच्या अॅब्सवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे. तसंच त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिल्याचे प्रशांत यांनी सांगितलं आहे. योग्य तो आहार देण्यात आला आहे.

टॅग्स :वरूण धवनकलंक