Join us

'कुली नंबर १'मधील वरूण धवन व सारा खानचा समोर आला फोटो, दिसले ख्रिश्चन वर-वधूच्या रुपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 08:00 IST

सध्या वरूण धवन व सारा आली खान 'कुली नंबर १'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.

सध्या वरूण धवन व सारा आली खान 'कुली नंबर १'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटातील पोस्टर समोर आला आहे. या पोस्टरमध्ये वरूण धवनसारा अली खान पहायला मिळत आहेत. ते दोघे ख्रिश्चन वर वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. 

कुली नंबर १चा पोस्टर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 

या पोस्टरमध्ये वरूण व सारा खूप छान दिसत आहेत. ते दोघे ख्रिश्चन लग्नातील गेटअपमध्ये दिसत आहे. वरूणने साराला उचलले आहे. 

गोविंदा व करिश्मा कपूर यांचा कुली नंबर १ चित्रपटाचा हा रिमेक आहे. यात या दोघांची जागा वरूण धवन व सारा अली खानने घेतली आहे. हे दोघे रिमेकसाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे. १ मे, २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली नं-1' सिनेमात गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान आणि शक्ती कपूरसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. या सिनेमाला रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. आजही कुली नंबर 1 आठवताच गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यामधील असलेली केमिस्ट्री आजही डोळ्यासमोर उभी राहते.

इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :कुली नंबर वनवरूण धवनसारा अली खान