‘देवा देवा’ गाण्याच्या लाँचिंग सोहळयात वरूण-आलिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
मुंबईत अलीकडेच गणेश आचार्य यांच्या ‘देवा देवा’ या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. या सोहळ्याला वरूण धवन आणि आलिया भट्ट यांना आमंत्रित केले होते.
‘देवा देवा’ गाण्याच्या लाँचिंग सोहळयात वरूण-आलिया!
मुंबईत अलीकडेच गणेश आचार्य यांच्या ‘देवा देवा’ या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. या सोहळ्याला वरूण धवन आणि आलिया भट्ट यांना आमंत्रित केले होते. या इव्हेंटवेळी त्यांचा हा अंदाज फोटोग्राफर्सनी कैद केला. वरूण-आलिया यांनी स्टेजवर येऊन गणपती बाप्पाचे पूजन केले. दीपप्रज्वलन करताना वरूण-आलिया यांनी फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. संपूर्ण टीमसोबत वरूण-आलिया यांनी प्रेक्षकांना अशा अंदाजात पोझ दिली. एका चाहत्याने वरूण-आलियाला त्यांच्या मुलासोबत एक फोटो काढण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी स्वप्नील जोशीसह अशी क्यूट पोझ दिली. गायक सुखविंदर सिंग हा देखील या इव्हेंटला आला होता. गणेश आचार्य, वरूण धवन, आलिया भट्ट आणि स्वप्नील जोशी यांनी गणपती बाप्पांच्या कानांप्रमाणेच हात दाखवून अनोख्या ढंगात फोटोसेशन केले.