Join us  

वनिता खरातने न्यूड फोटोशूट केल्यानंतर अशी होती तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 3:42 PM

आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

ठळक मुद्देवनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले होते.

अभिनेत्री वनिता खरात तिने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. वनिताच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिने हे न्यूड फोटोशूट केल्यानंतर तिच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल वनिताने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. 

वनिताने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मी हे फोटोशूट करण्याआधी याविषयी माझ्या आई-वडिलांना कोणतीच कल्पना दिलेली नव्हती. पण हे फोटोशूट झाल्यानंतर मी माझ्या आई-वडिलांना याबद्दल सांगितले आणि या फोटोशूटचे फोटो दाखवले. त्यांनी सगळ्या गोष्टी खूपच सकारात्मकतेने घेतल्या. हे माझे कामच असल्याने यात काही वाईट नाहीये असे त्यांनी मला सांगितले. तसेच हा फोटो खूपच छान आला आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले होते. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने पोस्टसोबत लिहिले होते. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

वनिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले होते की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे ... कारण मी, मी आहे.

कबीर सिंग या चित्रपटात शाहिद आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना प्रचंड आवडला होता. शाहिदच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या हातून चुकून काचेचा ग्लास फुटतो, त्यावर शाहिद तिच्या मागे मारायला धावतो. घरापासून ते बिल्डिंगच्या प्रवेशद्वारापर्यंत ही मोलकरीण जीव तोडून धावते. या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. या चित्रपटातील या मोलकरणीच्या भूमिकेत वनिता खरात होती.

टॅग्स :वनिता खरात