Join us  

Urvashi Rautela: अच्छा... तर हा आहे उर्वशी रौतेलाचा RP? अभिनेत्रीने शेअर केला साऊथ स्टारसोबतचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 4:01 PM

Urvashi Rautela : उर्वशीने तीन तासांआधी हा फोटो शेअर केला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्स या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत...

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचं नाव क्रिकेटपटू ‘आरपी’ अर्थात रिषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडलं जातंय. सोशल मीडियावरचा दोघांचं भांडण सर्वांना ठाऊक आहेच. उर्वशी अनेकदा रिषभला डिवचणाऱ्या पोस्ट शेअर करताना  दिसते. आता मात्र उर्वशीने ‘आरपी’सोबतचा फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अर्थात हा ‘RP’ रिषभ पंत नसून राम पोथीनेनी ( Ram Pothineni ) आहे. होय, उर्वशीने साऊथ स्टार राम पोथीनेनीसोबतचा फोटो शेअर केला आहे.उर्वशीने तीन तासांआधी हा फोटो शेअर केला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्स या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

उर्वशीने राम पोथीनेनीसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याला टॅग केलं आहे. शिवाय सोबत गुलाबाचं फुल व हार्ट इमोजी पोस्ट केला.उर्वशीने हा फोटो पोस्ट केला आणि सोशल मीडिया युजर्सनी पुन्हा एकदा उर्वशीची मजा घ्यायला सुरूवात केली. अच्छा, तर हा आहे आरपी, अशी कमेंट एका युजरने केली. तर एका युजरने याचा संबंध थेट भाऊबीजेसोबत जोडला. तुम्हा दोघांना भाऊबीजेच्या शुभेच्छा, असं या युजरने लिहिलं.

राम पोथीनेनी हा तेलगू चित्रपटसृष्टीतील मोठा स्टार आहे. Devadasu या चित्रपटातून त्याने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. Ready, Kandireega, Vunnadhi Okate Zindagi आणि Hello Guru Prema Kosame  अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. आता या राम पोथीनेनीचा आणि उर्वशीचा संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.तर संबंध आहे. होय, दोघंही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. राम पोथीनेनी दिग्दर्शक Boyapati Srinu च्या एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारतो आहे. या चित्रपटात उर्वशी एक स्पेशल सॉन्ग करताना दिसणार आहे. 

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतबॉलिवूड