Join us  

  पुन्हा पडता पडता वाचली उर्वशी रौतेला...! पाहा व्हिडिओ !!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 11:01 AM

‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.

ठळक मुद्देमध्यंतरी ती अशीच पडता पडता वाचली होती. हाय हिल्स घालून पोज देता देता अचानक तिचे संतुलन बिघडते होते. याचा व्हिडिओही उर्वशीने गंमत म्हणून सोशल मीडियावर शेअर केला होता.

‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. याशिवाय छोट्या पडद्यावरच्या अनेक लहान-मोठ्या शोमध्येही हजर असते. अलीकडे उर्वशी एका किड्स अवार्ड शोमध्ये पोहोचली.

या इव्हेंटमध्ये आलिया भट्ट आणि वरूण धवनही हजर होते. अवार्ड शोदरम्यान उर्वशी मुलांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ गेली. उर्वशीला पाहून मुलं उत्साहित झालीत. इतकी की, तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचू लागली. ही खेचाखेची इतकी वाढली की, उर्वशी पडता पडता वाचली. या घटनेचा व्हिडिओ उर्वशीने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.  

 मध्यंतरी ती अशीच पडता पडता वाचली होती. हाय हिल्स घालून पोज देता देता अचानक तिचे संतुलन बिघडते होते. याचा व्हिडिओही उर्वशीने गंमत म्हणून सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमुळे तिला ट्रोलही व्हावे लागले होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींनी तिला ‘नौटंकी’म्हटले होते तर काहींनी पडली असती तर मज्जा आली असते, असे सुनावले होते.

२०११ मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा चित्रपट तिच्या झोळीत पडला.

टॅग्स :उर्वशी रौतेला