Join us

“घ्या, तुमची इच्छा पूर्ण...” म्हणत उर्फीने शेअर केला बिकिनी व्हिडीओ, चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 16:20 IST

Chitra wagh vs Urfi Javed : सध्या उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चर्चेत आहे. उर्फी चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहिये...

Chitra wagh vs Urfi Javed : आपल्या प्रचंड बोल्ड फॅशनमुळे ओळखली जाणारी उर्फी जावेद  (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. होय, भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या जाहिर अंगप्रदर्शनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. उर्फीला विरोध नाही, पण तिचा नंगानाच सुरू आहे, त्याला विरोध आहे, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली आहे. ‘शी…ऽऽऽऽ  अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे  IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये...,’असं पहिलं  ट्विट त्यांनी केलं आणि इथून सगळं प्रकरण सुरू झालं. तेव्हापासून उर्फी चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. आता तर तिने एक बोल्ड व्हिडीओ पोस्ट करत चित्रा वाघ यांना नव्यानं डिवचलं आहे.

‘ तुम्हाला माझ्या हातात बेड्या पाहायच्या होत्या, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण झाली...,’असं कॅप्शन देत उर्फीनं एक बिकिनी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

याआधी उर्फीने चित्रा वाघ यांच्या  ट्विटला खरमरीत उत्तर दिलं होतं. ‘जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहिर करत असाल तर मी जेलमध्ये जायला तयार आहे,’असं थेट आव्हानच उर्फीने दिलं होतं.

एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो, ते आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरूष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत, असं ती म्हणाली होती. इतकंच नाही तर लवकरच आपण चांगल्या मैत्रिणी होऊ चित्रूsss..., असंही उर्फी म्हणाली होती.

टॅग्स :उर्फी जावेदचित्रा वाघ