अपकमिंग बायोपिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 06:08 IST
‘रिअल इन्पायरिंग लाईफ स्टोरी’ अर्थात बायोपिक हा सध्या बॉलिवूडच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. ‘नीरजा’ या ताज्या बायोपिकला प्रेक्षकांची मोठी ...
अपकमिंग बायोपिक
‘रिअल इन्पायरिंग लाईफ स्टोरी’ अर्थात बायोपिक हा सध्या बॉलिवूडच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. ‘नीरजा’ या ताज्या बायोपिकला प्रेक्षकांची मोठी पसंती लाभली. येत्या काळात अशाच काही बायोपिक मुव्हिज आपल्याला पाहायला मिळणार आहेत.एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरीक्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला. २०११ मध्ये विश्वचषकावर भारताचे नाव कोरणारा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर बेतलाला बॉलिवूडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात सुशांत सिंग राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अझहर धोनीप्रमाणेच आणखी एक नामवंत क्रिकेटपटू मोहम्मद अझहरूद्दीन याच्यावरचा चित्रपटही येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अझहरच्या कायम वादग्रस्त राहिलेल्या आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना यात दिसणार आहेत. इमरान हाश्मी या चित्रपटात अझहरची भूमिका वटवणार आहे.मै और चार्ल्सखेळाडूच नाहीत तर गॅगस्टरचे रहस्यमय आणि गुन्हेगारीने व्यापलेले आयुष्यही बॉलिवूड दिग्दर्शकांना खुणावत आहे. सिरिअल किलर आणि ड्रग डिलर चार्ल्स शोभराज याच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमाही आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणे अपेक्षित आहे.डॅडीचार्ल्स शोभराज याचप्रमाणे गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा क्राईम बायोपिक मोठ्या पडद्यावर येत आहे. अर्जून रामपाल यात डॅडीची भूमिका वठवताना दिसणार आहे.संजय दत्त बायोपिकअभिनेता संजय दत्तवरील बायोपिकची चर्चा बºयाच दिवाांपासून होती. अखेर राजकुमार हिरानी हे संजूबाबाच्या आयुष्याचा पट आपल्या बॉलिवूडपटात उलगडताना दिसणार आहेत. रणबीर कपूर संजूबाबाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.किशोर कुमार बायोपिककिशोर कुमार या सुप्रसिद्ध गायक व अभिनेत्याचे आयुष्य हा सगळ्यांसाठी उत्सूकतेचा विषय राहिले आहे. किशोर कुमार यांच्या जीवनपट मोठ्या पडद्यावर घेऊन येणे अनुराग बासू यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरलेच तर रणबीर कपूर हाच अनुराग यांची पहिली निवड असणार आहे.