Join us  

राज कुंद्राने काढला मास्क, उर्फी जावेदसोबतचा 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 4:57 PM

उर्फी जावेद आणि राज कुंद्राचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बरेच दिवस माध्यमांसमोर आला नव्हता. पण जेव्हा तो माध्यमांसमोर आला, तेव्हा तो चित्रविचित्र मास्क घालून पापाराझींसमोर आला.  नेहमीचं तो विविध प्रकारचे मास्क चेहऱ्याला लावून तो कॅमेऱ्यासमोर येतो. पण आता असं काही घडलं आहे, जे पाहिल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही. उर्फी जावेद आणि राज कुंद्राचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राजने चक्क आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आहे. 

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती आणि राज कुंद्राने एकसारखे मास्क घातल्याचे दिसतंय. यात कुंद्रा चक्क आपला मास्क काढतो आणि उर्फी जावेद हिच्या हातामध्ये देतो. यानंतर उर्फी जावेद स्वत: चा मास्क काढते. तर या व्हिडीओला कॅप्शनमध्ये लिहलं की, ये तो बस ट्रेलर है. 

आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. दोघांचा हा व्हिडीओ पाहून सर्वचजण हैराण झालेत. कारण, कालपर्यंत भांडणारे राज कुंद्रा आणि उर्फी जावेद एकत्र आल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. या अनेकांनी कमेंट केल्यात. एकाने म्हटलं की, '2 दिवसांपूर्वी यांचं भांडण झालं होतं. आता मी व्हिडिओ बनवत आहेत'. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, 'राज कुंद्राजी तुमच्या चित्रपटात उर्फीला घ्या '.

अलीकडेच राज कुंद्रा एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये उर्फी जावेद हिच्यावर भाष्य केलं होतं. राज कुंद्रा थेट म्हणाला की, 'मागच्या दोन वर्षांपासून पापाराझी यांच्या नजरा फक्त माझ्यावर आणि उर्फी जावेद हिच्यावर आहेत. तिने काय घातले नाही आणि मी काय घातले यावर'.  राज कुंद्रा याचे हे बोलणे ऐकून उर्फी जावेद हिचा पारा चांगलाच वाढला. यानंतर थेट उर्फी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज कुंद्रा याच्या बोलण्याचा चांगलाच समाचार घेतला. राज कुंद्राला थेट उर्फी जावेद हिने पाॅर्न किंग देखील म्हटले. 

टॅग्स :राज कुंद्राउर्फी जावेदसोशल मीडियाट्रोलफॅशन