Join us  

VIDEO: सुशांतच्या या Unseen व्हिडीओंमुळे उडाली खळबळ; रियाचं पितळ पडलं उघडं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 12:13 PM

सुशांतचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत आणि या व्हिडिओवरून रियाला ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता ड्रग अँगल समोर आला आहे. सुरूवातीला त्याच्या आत्महत्सेला बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार आहे, असे बोलले जात होते. मात्र तपास पुढे सरकू लागला तसा नवीन खुलासे समोर येऊ लागले. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर ड्रग्स अँगल समोर आला. सुशांत ड्रग्सचे सेवन करत असल्याचा खुलासा झाला. आता सुशांतचा अनसीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सुशांतच्या या दोन अनसीन व्हिडिओमध्ये तो अस्वस्थ, बैचेन वाटतो आहे. झी न्यूजने सुशांतचा हा अनसीन व्हिडिओ शेअर करत असंख्य प्रश्न उभे केले आहेत. या व्हिडिओतून रियाचे पितळ उघडं पडल्याचा दावा झी न्यूजच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रियाने सुशांतच्या मैत्रीच्या नावावर त्याची फसवणूक केली आहे. तिने त्याला लाचार बनवले. तिने सुशांतच्या घरातल्यांपासून हे सत्य लपवले. सुशांतला प्रेमाच्या नावाखाली रियाने फसविले आहे. ड्रग्स दिले, अशी चर्चा या व्हिडीओंमुळे सुरू झालीय.

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

सुशांतचे हे दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर रिया चक्रवर्तीवर टीकेची झोड उठली आहे. रियाने सुशांतला हळू हळू विष दिले जसे त्याचे वडील म्हणत होती. रिया त्याची काळजी का घेत नव्हती ? ती डॉक्टरकडे त्याला का घेऊन गेली नाही ? अशा अवस्थेत सुशांत घरात का होता ?अशाच रितीने रिया सुशांतला कंट्रोल करत होती. प्लानिंग करून सुशांतला ड्रग्स दिले का, असे असंख्य प्रश्न झी न्यूजच्या रिपोर्टमधून उपस्थित करण्यात आले आहेत.

'हा' बॉलिवूड अभिनेता रियासोबत काम करण्यासाठी तयार, म्हणाला - आम्ही वाट बघू....

सुशांतचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत आणि या व्हिडिओवरून रियाला ट्रोल केले जात आहे.

रिया चक्रवर्तीला अटकेनंतर चांगलीच चर्चा रंगली. तसेच तिने घातलेल्या टी-शर्टवरील टेक्स्टही चांगलीच चर्चेत राहिलं. त्यावर लिहिलं होतं की, 'गुलाब लाल असात, वॉयलेट्स निळे असतात, आपण सगळे मिळून पितृसत्तेचा हा किल्ला उद्धवस्त करू'. आता रियाच्या टी-शर्टवरील हा मेसेज तिच्या समर्थनाचं माध्यम ठरला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीने हा संदेश शेअर करून रियाला सपोर्ट केलाय आणि तिच्या अटकेला विरोध केलाय.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती